Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 9 October 2019

सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया : केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.आफ्रिकेत सेनेगल पास…

सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया :
  • केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे.
  • तर ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे. तसेच वातावरणातील बदलांशी सामना करण्यासाठी आफ्रिकेत अशी भिंत उभारण्यात आली आहे. याला ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असंही म्हटलं जातं.
  • सध्या हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी याकडे एक उदाहरण म्हणून पाहता येऊ शकते. थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त गुजरातराजस्थानहरियाणा ते दिल्लीपर्यंत परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते.

बालाकोट हवाई हल्ल्यातील स्क्वॉड्रन पदकांनी सन्मानित :
  • बालाकोट हल्ल्यात सहभागी असलेले दोन स्क्वॉड्रन आणि भारतीय हवाई दलाच्या एका युनिटला पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भारतीय हवाई दल दिनाच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी 51 स्क्वॉड्रन आणि 601 एक युनिट व नऊ स्क्वॉड्रन यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यातील सहभागाबद्दल पदके प्रदान करून सन्मानित केले.
  • बालाकोट हल्ल्यातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य वैमानिकांनी या वेळी हवाई कसरतींमध्ये भाग घेतला. पाकिस्तानसमवेत झालेल्या लढाईच्या वेळी वर्धमान यांनी शत्रुपक्षाचे विमान पाडले होते.
  • तसेच हवाई दल दिनानिमित्त भदौरिया यांनी बालाकोट हल्ल्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व स्क्वॉड्रननी असामान्य धैर्यनिर्धार आणि व्यावसायिकता दाखवून भारताचा विजय निश्चित केला

भारताला मिळालं पहिलं राफेल लढाऊ विमान
  • भारताला पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले आहे. विजयादशमी आणि एअरफोर्स डेनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सच्या बोर्डेक्स येथील डॅसॉल्ट प्लांटमध्ये पोहोचले व तेथून विमानं ताब्यात घेतले.
  • राफेल हे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त एक लढाऊ विमान आहे. राफेल यांच्या हस्तांतरण सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले कीहा एक ऐतिहासिक दिवस आहे.

जेम्स पीबल्समिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान :
  • महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • विश्वाचा वेध घेणारे हे अतिशय क्रांतिकारी संशोधन असल्याचे नोबेल निवड समितीने या तिघांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे.
  • विश्वाच्या उत्क्रांत अवस्थांचा अभ्यास पीबल्स यांनी केला असून मेयर व क्वेलॉझ यांनी १९९५ मध्ये दूरवर सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावला होता त्यानंतर आतापर्यंत चार हजारहून अधिक बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे.
  • रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली असून नऊ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर्सच्या रकमेतील निम्मा वाटा जेम्स पीबल्स यांना मिळणार असून इतर दोघांना उर्वरित रक्कम सारखी वाटून दिली जाणार आहे.
  • जेम्स पीबल्स हे न्यूजर्सी येथील प्रिन्स्टन विद्यपीठात प्राध्यापक असून त्यांनी विशची उत्क्रांती व पृथ्वीचे विश्वातील स्थान यावर संशोधन केले. महाविस्फोटानंतरच्या वैश्विक सूक्ष्म लहरी म्हणजे सीएमबीआरचे अस्तित्व त्यांनी पहिल्यांदा वर्तवले होते.

No comments