Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 8 October 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव ___________ येथे आयोजित करण्यात आला आहे.
A) राजस्थान
B) उत्तराखंड
C) हिमाचल प्रदेश
D) केरळ

2) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
A) कटारिना जॉनसन थॉम्पसन
B) व्हेरेना प्रीनर
C) नाफिसातौ थियाम
D) लॉरा मुइर

3) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) _______ जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे.
A) बागलीहार जलविद्युत प्रकल्प
B) किशनगंगा जलविद्युत प्रकल्प
C) पाकल दुल प्रकल्प
D) सलाल जलविद्युत प्रकल्प

4) कोणत्या देशाने मिनिटेमन III’ नावाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
A) उत्तर कोरिया
B) चीन
C) अमेरिका
D) इराण

5) _____ या तारखेला जागतिक पशू दिन साजरा केला जातो.
A) 3 ऑक्टोबर
B) 7 ऑक्टोबर
C) 4 ऑक्टोबर
D) 10 ऑक्टोबर

6) लोकांमध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी HDFC बँकेनी _______ नावाने एक उपक्रम राबवविण्यास सुरूवात केली आहे.
A) प्रगती रथ
B) उडान
C) ज्ञान रथ
D) उद्यम रथ

उत्तरे
1. (B) उत्तराखंड
3-15 ऑक्टोबर 2019 या काळात पिठोरागड (उत्तराखंड) येथे भारत आणि कझाकस्तान यांचा “KAZIND-2019” नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे.

2. (A) कटारिना जॉनसन थॉम्पसन
दोहा (कतार) येथे सुरू असलेल्या जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये कटारिना जॉनसन थॉम्पसन हिने 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले.

3. (A) बागलीहार जलविद्युत प्रकल्प
जम्मू व काश्मीर राज्यातल्या बागलीहार जलविद्युत प्रकल्पावर आपली 300 लोकांची तुकडी तैनात ठेवण्याचा निर्णय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) घेतला आहे.

4. (C) अमेरिका
ऑक्टोबर 2019 रोजी अमेरिका या देशाने मिनिटेमन III’ नावाच्या आंतररखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 6,750 कि.मी.चा प्रवास करू शकण्यास सक्षम आहे.

5. (C) 4 ऑक्टोबर
दरवर्षी ऑक्टोबरला जागतिक पशू दिन साजरा केला जातो. या दिवशी जगात प्राण्यांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणासाठी जागरूकता पसरवली जाते.

6. (A) प्रगती रथ
लोकांमध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी HDFC बँकेनी प्रगती रथ नावाने एक उपक्रम राबवविण्यास सुरूवात केली आहे. हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या हस्ते महिनाभर चालणार्‍या या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रगती रथ नावाची व्हॅन राज्याच्या विविध भागात जाऊन लोकांना साक्षर करणार.

No comments