Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 8 October 2019

सुमितने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 129 व्या क्रमांकावर स्थान मिळवले : भारतीय टेनिसपटू सुमित नागलने पुरुषांच्या एकेरीच्या क्रमवारीत सहा स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 129 क्रमांक मिळविला.सप्टेंबर 2019 मध्ये अर्जेटिना एट…

सुमितने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 129 व्या क्रमांकावर स्थान मिळवले :
  • भारतीय टेनिसपटू सुमित नागलने पुरुषांच्या एकेरीच्या क्रमवारीत सहा स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 129 क्रमांक मिळविला.
  • सप्टेंबर 2019 मध्ये अर्जेटिना एटीपी चॅलेन्जर क्ले इव्हेंटमध्ये 26 स्थानांची झेप घेत नागले यांनी करिअरची सर्वोत्तम क्रमांकाची 135 रँकिंग मिळविली होती.

भारतातील पहिले ई-कचरा क्लिनिकची स्थापना :
  • भोपाळ महानगरपालिका (बीएमसी) आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) यांनी देशातील पहिले ई-कचरा क्लिनिक स्थापित करण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
  • घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही घटकांपासून कचरा वेगळे करणेप्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावण्यास सक्षम करेल.

नोबेल पुरस्कारांसाठी वैद्यकशास्त्रातील या तीन शास्त्रज्ञांची निवड :
  • जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.
  • विल्यम जी.केलिनसर पीटर जे. रेटक्लिफग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
  • सोमवारी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे. भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

विष्णू नंदन: सर्वात मोठ्या आर्क्टिक मोहिमेमध्ये सहभागी झालेला भारतीय
  • केरळचे 32 वर्षीय ध्रुवीय संशोधक विष्णू नंदन हे मल्टीडिसीप्लिनरी ड्रिफ्टिंग अब्जर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट’ (MOSAiC) या अभ्यास मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले एकमेव भारतीय ठरले आहेत.
  • पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणात होणार्‍या बदलांविषयी अभ्यास करण्यासाठी यंदा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सागरी माहिती सामायिक करण्यास भारताचे IFC-IOR केंद्र कार्यरत :
  • भारतीय नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाने हिंद महासागरातून होणार्‍या सागरी क्रियाकलापांविषयीची माहिती सामायिक करण्यास सुरुवात केली आहे.
  • गोवा मेरीटाईम कॉन्क्लेव्ह 2019’ या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी IOR क्षेत्रातल्या देशांना या सुविधेचा उपयोग करून घेण्याविषयी प्रस्ताव मांडला.
‘IFC-IOR’ विषयी
  1. डिसेंबर 2018 मध्ये गुरुग्राम (गुडगाव) येथे भारतीय नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते.
  2. भागीदार देश आणि बहुराष्ट्रीय संस्थांच्या सहयोगाने सागरासंबंधी जागृती वाढविण्यास आणि विशेषकरून व्यवसायिक मालवाहू जहाजांसंबंधी माहिती सामायिक करण्याच्या उद्देशाने हे केंद्र उघडण्यात आले. हे केंद्र आपत्ती निवारणासाठी देखील कार्य करीत आहे.
  3. केंद्राचे आतापर्यंत 18 देश आणि 15 बहुराष्ट्रीय / सागरी सुरक्षा केंद्रांशी संबंध जोडले गेले आहेत.
  • हिंद महासागराच्या सागरी क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी उपग्रहांचे एक जाळे तयार करण्यासाठी भारत आणि फ्रान्स एकत्र कार्य करीत आहेत. हिंद महासागरी क्षेत्रामधून (IOR) जगातला जवळपास 75% पेक्षा जास्त समुद्री व्यापार आणि जागतिक तेलाचा 50% व्यापार होतो.

No comments