Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे
1) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एका बिगर-बँकिंग वित्तीय संस्थेसाठी कोणत्याही बँकेची एक्सपोजर मर्यादा टियर-1 भांडवलाच्या विद्यमान 15 टक्क्यांवरून वाढवत ________ टक्क्यांपर्यंत केली.
A) 20 टक्के
B) 25 टक्के
C) 21 टक्के
D) 28 टक्के
2) 7 ऑगस्ट रोजी निधन झालेल्या ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे नाव काय आहे?
A) व्ही. शांताराम
B) गिरीश कर्नाड
C) जे. ओम प्रकाश
D) के. बालाचंदर
3) 7 ऑगस्टच्या निर्णयानुसार वर्तमानातला रेपो दर किती आहे?
A) 6.0%
B) 5.65%
C) 5.40%
D) 5.15%
4) कोणत्या व्यक्तीने ‘रोजगार समाचार’ याची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती अनावरीत केली?
A) नरेंद्र मोदी
B) प्रकाश जावडेकर
C) राम नाथ कोविंद
D) अमित शहा
5) कोणत्या शहराकडे दहाव्या ‘आशिया जलतरण महासंघ (AASF) एशियन एज ग्रुप अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे यजमानपद आहे?
A) बेंगळुरू
B) कोचीन
C) चेन्नई
D) जयपूर
6) ATP वॉशिंग्टन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी रशियाच्या डॅनिल मेदवेदेव ह्याला कोणी पराभूत केले?
A) रॉजर फेडरर
B) राफेल नदाल
C) निक किर्गीओस
D) नोव्हाक जोकोविच
उत्तरे
1. (A) 20 टक्केउत्तरे
बँकांना प्राधान्य क्षेत्रातला प्रमुख कर्जप्रदाता म्हणून वागविण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) बँकांना बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) माध्यमातून कृषी, MSME उद्योग आणि परवडणारी घरे या क्षेत्रांमध्ये कर्ज वाटप करण्यास परवानगी दिली आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेनी एका बिगर-बँकिंग वित्तीय संस्थेसाठी कोणत्याही बँकेची एक्सपोजर मर्यादा टियर-1 भांडवलाच्या विद्यमान 15 टक्क्यांवरून वाढवत 20 टक्क्यांपर्यंत केली आहे.
2. (C) जे. ओम प्रकाश
7 ऑगस्ट 2019 रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता जे. ओम प्रकाश यांचे निधन आहे. ते 93 वर्षांचे होते. ‘आप की कसम’, ‘आखिर क्यों?’, ‘अपनापन’ ही त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांची नावे आहेत.
3. (C) 5.40%
7 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची (0.35 टक्क्यांची) कपात करीत नवा रेपो दर 5.40 टक्के एवढा निश्चित केला. RBIच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने (MPC) हा निर्णय घेतला. तर, रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के इतका करण्यात आला आहे. रेपो दर कमी केल्यामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
4. (B) प्रकाश जावडेकर
केंद्रीय रोजगार व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘रोजगार समाचार’ या सरकारी वृत्तपत्राची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती अनावरीत करण्यात आली आहे.
5. (A) बेंगळुरू
बेंगळुरू (कर्नाटक) या शहराकडे दहाव्या ‘आशिया जलतरण महासंघ (AASF) एशियन एज ग्रुप अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे यजमानपद आहे. ही स्पर्धा 24 सप्टेंबर 2019 ते 2 ऑक्टोबर 2019 या काळात खेळवली जाणार आहे. भारतीय जलतरण महासंघ (SFI) हा 9 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करणार आहे.
6. (C) निक किर्गीओस
ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओस ह्याने ‘ATP वॉशिंग्टन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले. त्याने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेव ह्याला पराभूत केले
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete