वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर : कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global in…
वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर :
- कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला. त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारत 52 व्या क्रमांकावर आहे.
- यादीमध्ये स्वित्झर्लंड अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ स्विडन, अमेरीका, नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर, जर्मनी आणि इस्राएल या देशांचा क्रम लागतो आहे.
✔अहवालानुसार,
1) गेल्या वर्षीच्या 57 व्या क्रमांकाच्या तुलनेनी यावर्षी भारताने प्रगती केल्याचे दर्शविण्यात आले आहे.
2) येत्या काळात भारत मध्य आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातली सर्वाधिक नवकल्पक अर्थव्यवस्था असणार.
3) कामगार मनुष्यबळात उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांच्या संख्येच्या बाबतीत भारत कमी आहे.
4) गुणवत्तापूर्ण शिक्षण, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाला प्रवेश व वापर तसेच माध्यमिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर यासारख्या भागात भारत कमी पडला आहे.
5) क्लस्टर रँकिंग या विशेष गटात समूह विकासाच्या परिस्थितीत भारताने प्रगती दर्शविलेली आहे.
- या निर्देशांकमध्ये 129 देशांचा समावेश करण्यात आला आहे. तयार करण्यात आलेली यादी 80 निर्देशकांच्या अभ्यासावरून ठरविण्यात आली आहे, ज्यात अर्जप्रक्रिया, शिक्षणावरील खर्च आणि संशोधनात्मक व तंत्रात्मक प्रकाशने इत्यादी घटकांचा विचार केला गेला आहे.
अजय कुमार भल्ला: भारताचे नवे केंद्रीय गृहसचिव
- भारत सरकारने विशेष नियुक्तीच्या अंतर्गत वीज मंत्रालयाचे सचिव अजय कुमार भल्ला यांची पुढील गृहसचिव (Home Secretary) म्हणून नेमणूक केली आहे. भल्ला यांची दोन वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
- 1984 साली आसाम व मेघालय संवर्गामधील IAS अधिकारी अजय कुमार भल्ला यांची नेमणूक प्रभारी पदावर असलेल्या राजीव गौबा यांच्या जागी होऊ शकते, जे 31 ऑगस्ट 2019 रोजी निवृत्त होणार आहे.
- याशिवाय, IAS अधिकारी अतानू चक्रवर्ती यांना वित्त मंत्रालयात आर्थिक विभागाचे नवे सचिव म्हणून नेमण्यात आले आहे.
पिकांवर संशोधन करण्यासाठी महिंद्रा अॅग्रीचा नेदरलँडच्या कंपनीसोबत करार :
- महिंद्रा समुहाची महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी आणि नेदरलँडची की-जीन (KeyGene) कंपनी यांनी सहकार्याने पिकांवर संशोधन कार्य चालविण्यासाठी करार केला आहे.
- की-जीन कंपनी ही पिकांवर संशोधन कार्य करणारी कंपनी आहे आणि यांच्या शाखा अमेरीका आणि भारतामध्ये आहे. महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड (MASL) ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची उपकंपनी आहे.
- की-जीन कंपनीच्या संशोधन मंचाचा वापर आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि बाजारपेठेशी संबंधित गुणधर्मांच्या विकासासाठी केला जाणार आहे. या भागीदारीमधून अधिकच उत्पादनक्षम आणि बदलत्या हवामानात टिकाव धरून ठेवणार्या पिकांचे वाण तयार करण्यावर भर दिला जाईल. तणनाशक किटक आणि रोगांना प्रतिकारक ठरणार्या तसेच दुष्काळ, उष्णता अश्या परिस्थितींमध्ये टिकाव धरून ठेवणारे वाण तयार केल्या जातील.
'कारगिल विजय' दिवसाची २० वी वर्षपूर्ती, देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन :
- कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय जवानांनी मोठ्या शौर्याने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं.
- कारगिल विजय दिनानिमित्ताने द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहतील. शिवाय, राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
- कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती 25 जुलै ते 27 जुलै अशी तीन साजरी होत आहे. या कार्यक्रमाचा समारोप 27 जुलैला इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत.
- 20 वर्षापूर्वी कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. 8 मे ते 26 जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते, तर 1363 जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.
ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश :
- ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल यांच्यासह मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून समावेश केला आहे. ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन केले जात आहे. कुठल्याही जर-तर शिवाय ब्रिटन ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडेल, असा निर्धार जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.
- राणी एलिझाबेथ यांनी जॉन्सन यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी, आलोक शर्मा यांची आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपदी, तर ऋषी सुनाक यांची वित्त विभागाचे प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक केली. गुरुवारी सकाळी १० डाऊनिंग स्ट्रीट येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.
माहिती अधिकार कायदा दुरुस्तीचा मार्ग मोकळा :
- राज्यसभेत विरोधकांच्या ऐक्याला खिंडार पाडत केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा दुरुस्ती विधेयक गुरुवारी मंजूर करून घेतले. या दुरुस्ती विधेयकावर प्रवर समितीत सखोल चर्चा करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी विशेषत: काँग्रेस, तृणमूल काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी मांडला. मात्र तो ११७ विरुद्ध ७५ मतांनी फेटाळण्यात आला.
- दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता दिसू लागल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी प्रस्तावावरील मतदानानंतर सभात्याग केला. त्यानंतर आवाजी मतदानाने दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.
No comments