Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते _____ मूल्य असलेले एक स्मारक नाणे जाहीर करण्यात आले.
A) रु. 100
B) रु. 50
C) रु. 150
D) रु. 200
2) पंजाब नॅशनल बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?
A) सुनील मेहता
B) सुशीलचंद्र मिश्रा
C) सुनील मिश्रा
D) एस. एस. मल्लिकार्जुन राव
3) महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले?
A) संयुक्त राज्ये अमेरिका
B) पॅलेस्टाईन
C) मॉरिशस
D) दक्षिण आफ्रिका
4) कोणत्या बँकेनी सानुकूलित सेवा प्रदान करण्याकरिता भारतीय लष्कराबरोबर एक सामंजस्य करार केला?
A) भारतीय स्टेट बँक
B) कॅनरा बँक
C) बँक ऑफ बडोदा
D) पंजाब नॅशनल बँक
5) “इंडिया अँड द नेदरलँड्स - पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) विलियम-अलेक्झांडर
B) सौरभ कुमार
C) मार्टेन व्हॅन डेन बर्ग
D) वेणू राजामोनी
6) ‘बेस्ट लर्निंग अँड शेअरींग स्पेस अवॉर्ड 2019’ जिंकलेल्या राज्याचे नाव काय आहे?
A) मिझोरम
B) जम्मू व काश्मीर
C) केरळ
D) महाराष्ट्र
उत्तरे
1. (C) रु. 150
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रु. 150 मूल्य असलेले एक स्मारक नाणे जाहीर करण्यात आले.
2. (D) एस. एस. मल्लिकार्जुन राव
एस. एस. मल्लिकार्जुन राव हे पंजाब नॅशनल बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
3. (B) पॅलेस्टाईन
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त टर्की, पॅलेस्टाईन आणि उझबेकिस्तान सारख्या देशांनी स्मारक टपाल तिकीट प्रसिद्ध केलेत.
4. (C) बँक ऑफ बडोदा
अनेक सुविधांसह सानुकूलित सेवा प्रदान करण्याकरिता 2 ऑक्टोबर 2019 रोजी बँक ऑफ बडोदा या बँकेनी भारतीय लष्कराबरोबर एक सामंजस्य करार केला.
5. (D) वेणू राजामोनी
नेदरलँड्स मधील भारतीय राजदूत वेणू राजामोनी हे “इंडिया अँड द नेदरलँड्स - पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर” या पुस्तकाचे लेखक आहेत.
6. (B) जम्मू व काश्मीर
जम्मू व काश्मीर राज्याने ‘बेस्ट लर्निंग अँड शेअरींग स्पेस अवॉर्ड 2019’ जिंकला आहे.
No comments