Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 7 October 2019

भारतात घेऊन येणार पहिलं राफेल विमान : राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणं मंत्री राजनाथ सिंह पॅरिसला जाणार आहेत.8 ऑक्टोबर रोजी पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सकडून भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. दरम्यान, याच दिव…

भारतात घेऊन येणार पहिलं राफेल विमान :
  • राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणं मंत्री राजनाथ सिंह पॅरिसला जाणार आहेत.
  • 8 ऑक्टोबर रोजी पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सकडून भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. दरम्यानयाच दिवशी विजयादशमी असल्याने राजनाथ पॅरिसमध्ये राफेलचे पुजन अर्थात शस्त्रपूजन करणार आहे.
  • तर राजनाथ सिंह लवकरच पॅरिसला जाणार आहेत. तिथे ते फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅन्युएल मैक्रो यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते बोर्डेऑक्सला जाणार आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडे भारतासाठी बनवण्यात आलेले पहिले राफेल विमान सुपूर्द करण्यात येणार आहे.

हिम विजय’: भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव
  • चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेट प्रदेशाच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये भारतीय लष्कर पहिल्यांदाच हिम विजय’ या नावाने आतापर्यंतचा सर्वात मोठा पर्वतीय युद्ध सराव आयोजित केला आहे. सरावाची सांगता 25 ऑक्टोबर 2019 रोजी होणार.
  • नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत अरुणाचल प्रदेशातल्या पर्वतीय क्षेत्रात 14 हजार फूट उंचीवर नव्या प्रकाराचे युद्ध धोरण तपासण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.
  • सरावामध्ये प्रत्येकी 4 हजार सैनिक असलेले तीन गट तयार करण्यात आले आहेत.
  • या अभ्यासामध्ये नव्याने संकलित केलेल्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ (IBG) या तुकडीची क्षमता तपासली जात आहे.

हिटमॅनरोहित शर्माचा षटकारांचा नवा विक्रम :
  • टीम इंडियाचा 'हिटमॅनअशी ओळख असलेल्या रोहित शर्मा यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
  • रोहित शर्माने आता कसोटीवन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला. रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.
  • रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत. याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.
  • भारताने पहिल्या डावात ७ गडी गमावून ५०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावाची घोषणा केली होती. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल (२१५ धावा) आणि रोहित शर्मा (१७६ धावा) यांच्या खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

ऑर्बिटरने पाठवली चंद्रावरील छायाचित्रे :
  • चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरवर बसवण्यात आलेल्या ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्याने (ओएचआरसी) चंद्राच्या पृष्ठभागाची टिपलेली छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उपलब्ध केली आहेत. तसेच इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे ऑर्बिटरकडून पाच सप्टेंबर 2019 रोजी भारतीय प्रमाण वेळ 4.30 वाजता मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर ही छायाचित्रे घेतली गेली.
  • तर या छायाचित्रांत बोग्युस्लावस्की ई. क्रेटरचे (विवर) काही भाग टिपले गेले आहेत. या विवराचा व्यास 14 किलोमीटर व खोली तीन किलोमीटर असून हे विवर चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात आहे. या छायाचित्रांत चंद्रावर पाण्याने किंवा हवेने घासून वाटोळे झालेले मोठे खडक असल्याचे दाखवले आहेतअसे इस्रोने म्हटले.

No comments