Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कर प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) विकसित केलेल्या प्रणालीचे नाव काय आहे?
A) CIN
B) PFN
C) TIN
D) DIN
2) ग्राहकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने तयार केलेल्या अॅपचे नाव काय आहे?
A) कंज्युमर अॅप
B) कंज्युमर ग्रीव्हंस अॅप
C) ग्रीव्हंस अॅप
D) कंज्युमर अफेयर अॅप
3) वृद्ध व्यक्तींसाठी दिलेल्या सेवेबद्दल प्रख्यात ज्येष्ठ नागरिक व संस्थांना कोणता पुरस्कार दिला जातो?
A) सरस्वती सन्मान
B) वयोश्रेष्ठ सन्मान
C) पुराणी पीढी सन्मान
D) राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक पुरस्कार
4) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या संस्थेत भारतासाठीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?
A) सुबीर गोकर्ण
B) अरविंद सुब्रमण्यम
C) सुरजित भल्ला
D) बिबेक देबरॉय
5) तरुण संशोधक आणि उद्योजक होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी समर्थन म्हणून अटल इनोव्हेशन मिशन (AIM), NITI आयोगाचे अटल टिंकरिंग लॅब (ATL) आणि UNICEF इंडिया या संस्थांनी आरंभ केलेल्या योजनेचे नाव काय आहे?
A) यंग इनोव्हेटर
B) नेक्स्ट-जेन एन्त्रेप्रेनेऊर
C) गांधीयन चॅलेंज
D) यंग इंडिया इनोव्हेटर
उत्तरे
1. (D) DIN
'डिजिटल इंडिया'कडे वाटचाल करीत असताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 ऑक्टोबर 2019 पासून संगणकाद्वारे निर्माण होणारा ‘कागदपत्र ओळख क्रमांक’ (Document Identification Number -DIN) देण्यास आरंभ केला आहे. या क्रमांकामुळे कर प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करता येणार आहे. 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू झालेली ‘कागदपत्र ओळख क्रमांक’ प्रणाली प्राप्तिकर विभागाकडून होणार्या सर्व प्रकाराच्या संपर्कांना लागू असेल.
2. (A) कंज्युमर अॅप
ग्राहकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने “कंज्युमर अॅप” हे नवे मोबाइल अॅप सादर केले आहे. हे नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (NIC) द्वारे विकसित केले गेले आहे.
3. (B) वयोश्रेष्ठ सन्मान
वृद्ध व्यक्तींसाठी दिलेल्या सेवेबद्दल प्रख्यात ज्येष्ठ नागरिक व संस्थांना भारत सरकारकडून ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ हा पुरस्कार दिला जातो. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध व्यक्ती दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातात.
4.( C) सुरजित भल्ला
भारतीय अर्थशास्त्रज्ञ सुरजित एस. भल्ला ह्यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या संस्थेत भारतासाठीच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ते सुबीर गोकर्ण यांच्याकडून पदभार स्वीकारतील आणि ही नियुक्ती 3 वर्षांच्या मुदतीसाठी आहे.
5. (C) गांधीयन चॅलेंज
तरुण संशोधक आणि उद्योजक होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी समर्थन म्हणून अटल इनोव्हेशन मिशन (AIM), NITI आयोगाचे अटल टिंकरिंग लॅब (ATL) आणि UNICEF इंडिया या संस्थांनी 2 ऑक्टोबर 2019 रोजी “गांधीयन चॅलेंज” नावाने एक प्रतिस्पर्धेची घोषणा केली. महात्मा गांधीजींच्या तत्त्वांना व मूल्यांना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
No comments