Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 16 October 2019

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर : भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्थर डफलो (फ्रान्सच्या) आणि मायकेल क्रेमर (अमेरिकेचे) यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुर…

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर :
  • भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जीत्यांच्या पत्नी एस्थर डफलो (फ्रान्सच्या) आणि मायकेल क्रेमर (अमेरिकेचे) यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
  • 'जागतिक दारिद्र्य निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टीकोनया विषयावरील संशोधनात त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी पुरस्कार दिला जात आहे.

दृष्टीहिन IAS अधिकारी प्रांजल पाटील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी :
  • देशातील पहिली दृष्टीहिन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटीलने सोमवारी (14 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. महाराष्ट्रातील उल्हासनगरमधील असलेली प्रांजल हे केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणारी पहिली दृष्टीहिन आयएएस अधिकारी ठरली आहे.
  • प्रांजल पाटीलची दृष्टी जन्मापासून कमकुवत होतीपण वयाच्या सातव्या वर्षी तिची दृष्टी पूर्णत: गेली. परंतु ती खचली नाहीआयुष्यात काहीतरी करायचं आहेहा निश्चय करुन ती वाटचाल करत राहिली.
  • आपल्या पहिल्या प्रयत्नातच प्रांजलने यूपीएससी परीक्षेत 773 वं स्थान मिळवलं होतं. 30 वर्षीय प्रांजलने 2017 मध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत 124वं स्थान मिळवलं. मग प्रशिक्षणानंतर प्रांजलने 2017 मध्ये केरळच्या एर्नाकुलममध्ये असिस्टट कलेक्टर म्हणून आपल्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली.

चीनकडून नेपाळला 56 अब्ज रुपयांची मदत :
  • नेपाळच्या विकास कार्यक्रमांना मदत करण्यासाठी चीन येत्या दोन वर्षांत नेपाळला 56 अब्ज नेपाळी रुपयांची मदत करेलअसे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी रविवारी 20 करार केले.
  • शी जिनपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेनंतर शनिवारी येथे दाखल झाले. त्यानंतर जिनपिंग यांनी शनिवारी नेपाळच्या अध्यक्षा विद्या देवी भंडारी यांच्याशी चर्चा केली. रविवारी जिनपिंग यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली.

मार्गारेट अ‍ॅटवूडबर्नार्डिन इव्हारिस्टोंना बुकर पुरस्कार :
  • जागतिक परंपरांनी तयार केलेले नियम मोडण्यात आघाडीवर असणाऱ्या स्त्रियांनी आता प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांनाही परंपरेची कुंपणे तोडणे भाग पाडले. ख्यातनाम कॅनेडियन लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड आणि अँग्लो नायजेरियन वंशाच्या ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन इव्हारिस्टो या दोघींनी मिळून यंदाच्या मॅन बुकर पुरस्कारावर आपले नाव संयुक्तपणे कोरले आहे.
  • एकोणऐंशी वर्षे वयाच्या मार्गारेट अ‍ॅटवूड यांची द टेस्टामेंटस्’ ही बहुचर्चित कादंबरी बुकरची मानकरी ठरली आहे. बर्नार्डिन इव्हारिस्टो यांच्या गर्लवूमनअदर’ कादंबरीलाही बुकर’ मिळाले आहे. बुकर पुरस्काराच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात दोन्ही लेखिकांना पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.
  • पर्यावरणवादी चळवळीत अग्रणी असलेल्या अ‍ॅटवूड यांनी खांद्यावर एक्स्टिंक्शन रिबेलियन’ संस्थेचे चिन्ह लावूनच बुकर स्वीकारले. अ‍ॅटवूड यांची द टेस्टामेंटस्कादंबरी त्यांच्या द हॅण्डमेडस् टेल’ कादंबरीचाच पुढचा भाग असूनत्यात विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या तीन स्त्रियांचे आयुष्य रेखाटले आहे.

ब्रिगेडिअर कोसेगीने मॅरेथॉनचा विश्वविक्रम मोडला :
  • केनियाच्या ब्रिगेड कोसेगीने 13 ऑक्टोबर 2019 रोजी शिकागो मॅरेथॉन येथे 2:14:04 तासांच्या वेळेत महिला मॅरेथॉनचा विश्वविक्रम मोडला.
  • कोसेगीने 16 वर्षांचा हा विक्रम मोडला.
  • पूर्वीचा जागतिक विक्रम ग्रेट ब्रिटनच्या पॉला रॅडक्लिफकडे होता.
  • पूर्वीचे रेकॉर्ड 2: 15:25 तास.

आयएमएफकडूनही आर्थिक मंदीची पुष्टी :
  • भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याचे स्पष्टपणे सूचित करीतजागतिक बँकेपाठोपाठ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)नेही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराचा अंदाज खुंटविला आहे.  ‘आयएमएफने अर्थवृद्धी दर चालू वर्षांसाठी ६.१ टक्क्यांवर आणून ठेवताना पुढील वर्षांत तो ७ टक्के अंदाजला आहे. यापूर्वीचा या संस्थेचा अंदाज ६.४ टक्के होता. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने तो ०.३ टक्क्यांनी खाली खेचण्यात आला आहे.
  • आयएमएफने एप्रिलमध्ये भारताच्या विकास दराबाबत ७.३ टक्के पूर्वअंदाज व्यक्त केला होता. आता मात्र तो थेट १.२ टक्क्यांनी सुधारूनकमी केला गेला आहे. जागतिक बँकेने रविवारीच २०१९ मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा वेग ६ टक्के असेलअसे स्पष्ट केले. जागतिक बँकेचा विकसनशील देशाच्या प्रगतीचा यापूर्वीचा अंदाज ६.९ टक्के होता.

No comments