Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 16 October 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन _______ गव्हर्नन्स’ या युतीमध्ये भारत सामील झाला.
A) रोबोटिक्स
B) टेक्नॉलॉजी
C) एज्युकेशन
D) हेल्थ

2) कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?
A) करोलिना प्लिस्कोवा
B) नाओमी ओसाका
C) अॅशले बार्टी
D) कोको गॉफ

3) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला?
A) अभिजीत बॅनर्जी
B) पॉल रोमर
C) विल्यम नॉर्डॉस
D) रिचर्ड थेलर

4) ___________ या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.
A) 10 ऑक्टोबर
B) 12 ऑक्टोबर
C) 13 ऑक्टोबर
D) 15 ऑक्टोबर

5) खेडे आणि लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वेकडून चालू करण्यात आलेल्या ट्रेन सेवेचे नाव काय आहे?
A) महापरिनिर्वाण सर्व्हिस
B) लाईफलाईन सर्व्हिस
C) सेवा सर्व्हिस
D) गाँव सर्व्हिस

6) अलीकडेच चर्चेत असलेले लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?
A) औषधी
B) जलशुद्धीकरण
C) तांत्रिक शिक्षण
D) खगोलशास्त्र

7) _____ या संस्थेनी साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकसमेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
B) जागतिक आर्थिक मंच (WEF)
C) जागतिक बँक
D) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

8) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) डॉ. मनमोहन सिंग
B) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
C) अटलबिहारी वाजपेयी
D) चेतन भगत

उत्तरे
1. (B) टेक्नॉलॉजी
जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारत सामील झाला आहे. स्मार्ट शहरे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व नैतिक वापर करण्याच्या दिशेने कार्य करणार्‍या जगातल्या अग्रगण्य शहरांच्या जाळ्यातल्या 15 सदस्यांना सामील झाला आहे. जागतिक आर्थिक मंचाचा (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स’ हा समूह सार्वजनिक जागांवर जोडल्या गेलेल्या उपकरणांच्या वापरासाठी जागतिक मानदंड आणि धोरणांचे मानक तयार करणार आहे.

2. (D) कोको गॉफ
15 वर्षांची कोको गॉफ ही WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या लिंझ ओपन 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पूर्वी हा विक्रम वयाच्या 17 व्या वर्षी जिंकण्याचा जेनिफर कॅप्रियाटीव्हेनस आणि सेरेना विल्यम्स यांच्या नावावर होता.

3. (A) अभिजीत बॅनर्जी
भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जीत्यांच्या पत्नी एस्थर डफलो (फ्रान्सच्या) आणि मायकेल क्रेमर (अमेरिकेचे) यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. 'जागतिक दारिद्र्य निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टीकोनया विषयावरील संशोधनात त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी पुरस्कार दिला जात आहे.

4. (D) 15 ऑक्टोबर
2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) 15 ऑक्टोबर हा दिवस "जागतिक विद्यार्थी दिन" म्हणून जाहीर केला. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. कलाम यांच्या कर्तृत्वाचा तसेच वैज्ञानिक आणि राजकीय कारकीर्दीत शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

5. (C) सेवा सर्व्हिस
खेडे आणि लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सेवा सर्व्हिस ट्रेन’ सेवा चालू करण्यात आली आहे.

6. (B) जलशुद्धीकरण
लोटस-HR’ ही जलशुद्धीकरणाची प्रयोगशाळा आहेजी बारापुल्ला नाल्यातले पाणी यमुना नदीत सोडण्यापूर्वी त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करते. हा भारत सरकार आणि नेदरलँड्स सरकारचा संयुक्त प्रकल्प आहेजो नवी दिल्लीत सन डायल पार्क येथे उभारण्यात आला आहे.

7. (C) जागतिक बँक
जागतिक बँकेनी साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकसमेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसारबांग्लादेश हा देश दक्षिण आशियामधली भुटाननंतर दुसर्‍या क्रमांकाची वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. 2019-20 या वर्षात बांग्लादेशाचा 7.2 टक्के विकास दर अंदाजित करण्यात आला आहे. नेपाळची अर्थव्यवस्था देखील भारताच्या तुलनेत वेगाने वाढणार असा अंदाज आहे.

8. (B) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
1998 साली वाय. एस. राजन आणि डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेले पुस्तक प्रसिद्ध केले.

No comments