Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 15 October 2019

मुंबईतील 3 वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार : मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागोग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील चार हेरिटेज वास्तूंना युने…

मुंबईतील 3 वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार :
  • मुंबईतील फ्लोरा फाउंटननेसेट एलियाहू सिनागोगआवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील चार हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा यंदाचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
  • 16 वास्तूंना पुरस्कार: यंदा भारतभूतानचीनऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील 16 वास्तूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी 14 देशांमधून 57 वास्तूंची नोंदणी करण्यात आली होती. त्यातून या 16 वास्तू निवडण्यात आल्या आहेत.

नरेंद्र मोदीः सर्वाधिक फॉलोअर्स जागतिक नेता
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स जागतिक नेता बनले आहेत. नरेंद्र मोदी सोशल मीडिया व्यासपीठावर 30 दशलक्ष अनुयायांची कामगिरी गाठणारा आता जगातील एकमेव नेता आहे.
  • ट्विटरवर त्याचे 50.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या फेसबुक पेजवर 44.4 दशलक्षाहून जास्त लाईक्स आहेत. त्याच्याकडे स्वत: चे यूट्यूब चॅनेलही आहे.

भारतीय नन मरियम थ्रेसिआ यांना संतपद जाहीर :
  • व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय जोगीण (नन) मरियम त्रेस्या यांच्यासह आणखी चौघांना पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले.
  • केरळमधील त्रिशुर येथे मे 1994 मध्ये काँग्रिगेशन ऑफ दि सिस्टर्स ऑफ दि होली फॅमिलीची स्थापना केलेल्या मरियम त्रेस्या यांना सेंट पीटर्स चौकात झालेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मातील हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आले
  • तसेच केरळमधील या जोगिणीशिवाय ब्रिटनचे कार्डिनल जॉन हेन्री न्यूमनस्वित्झर्लंडच्या मार्गेरिट बेज या सामान्य महिलाब्राझीलच्या सिस्टर डुल्स लोपेस आणि इटलीच्या सिस्टर गिसेप्पिना वन्निनी यांनाही संतपद देण्यात आले.

जबलपूरमध्ये राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा प्रारंभ :
  • दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी मध्यप्रदेश राज्याच्या जबलपूर या शहरात दहाव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल लालजी टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम 21 ऑक्टोबर 2019 पर्यंत चालणार आहे.
  • भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भारतसिएरा लिओन यांनी सहा करारांवर स्वाक्षर्‍या केल्या :
  • भारत आणि सिएरा लिओन यांच्यात भात लागवडीसाठी 30 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची क्रेडिट लाइन वाढविण्यासह सहा करारांवर स्वाक्षर्‍या झाली.
  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सिएरा लिओनचे अध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांनी द्विपक्षीय संबंधांना आणखी दृढ करण्यासाठी वचनबद्ध केले.
  • श्री नायडू पश्चिम आफ्रिकी देशांच्या त्यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याच्या दुसर्‍या टप्प्यात सिएरा लिऑनची राजधानी फ्रीटाउन येथे पोहोचले.

भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर:
  • भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना 2019 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी 'अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अ‍ॅक्शन लॅबच्या माध्यमातून प्रयत्न केल्याबद्दल बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
  • हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. अभिजित यांच्याबरोबरच त्यांची पत्नी इस्थर डफलो आणि सहकारी मायकल क्रेमर या या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांचा हा गौरव असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.

No comments