Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 15 October 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) “वज्र प्रहार” हा कोणत्या देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे?
A) भारत आणि फ्रान्स
B) भारत आणि अमेरिका
C) भारत आणि ओमान
D) भारत आणि थायलंड

2) __________ ‘स्किल इंडिया रोजगार मेळावा’ आयोजित करते.
A) सूक्ष्मलघू व मध्यम उद्योग मंत्रालय
B) राष्ट्रीय लघु-उद्योग महामंडळ
C) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ
D) मनुष्यबळ विकास मंत्रालय

3) _____ यांनी हाऊ टू अवॉइड ए क्लायमेट डिझास्टर” हे शीर्षक असलेले एक नवे पुस्तक लिहिले आहे.
A) अल्बर्ट बेट्स
B) क्रिस्टिन ओहलसन
C) अॅना लापे
D) बिल गेट्स

4) ‘धर्म गार्डियन’ हा ________ या देशांच्या दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे.
A) भारत आणि चीन
B) भारत आणि श्रीलंका
C) भारत आणि अमेरिका
D) भारत आणि जापान

5) _____ यांना 2019 सालाचा नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला.
A) फिलेमोन यांग
B) अबी अहमद अली
C) जुहा सिपिला
D) नरेंद्र मोदी

6) _____ मध्ये राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला.
A) कर्नाटक
B) ओडिशा
C) राजस्थान
D) मध्यप्रदेश

7) __________ याने डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.
A) किमर कोपेजन्स
B) लक्ष्य सेन
C) मॅट मोरिंग
D) युसुके ओनोडेरा

8) __________ येथे जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
A) रशिया
B) न्युझीलँड
C) भारत
D) जर्मनी

उत्तरे 
1. (B) भारत आणि अमेरिका
वज्र प्रहार” हा भारत आणि अमेरिका या देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे. यावर्षी सिएटल येथे 13 ऑक्टोबर 2019 ते 28 ऑक्टोबर 2019 या काळात आयोजित करण्यात आला आहे.

2. (C) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) 'स्किल इंडिया रोजगार मेळावाआयोजित करते.

3. (D) बिल गेट्स
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी हाऊ टू अवॉइड ए क्लायमेट डिझास्टर: द सोल्युशन वी हॅव अँड द ब्रेकथ्रूज वी नीड” हे शीर्षक असलेले एक नवे पुस्तक लिहिले आहे.

4. (D) भारत आणि जापान
धर्म गार्डियन 2019’ हा भारत आणि जापान या देशांच्या दरम्यानचा लष्करी सराव आहेजो 19 ऑक्टोबर पासून ते 2 नोव्हेंबर या कालावधीत वैरंगटे (मिझोरम) येथे आयोजित केला जाणार आहे. हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो 2018 या सालापासून भारतात घेतला जातो.

 5. (B) अबी अहमद अली
शांती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली ह्यांना शांतीसाठीचा 100 वा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इरिट्रियाशी असलेले सीमावाद सोडविण्याच्या त्यांच्या पुढाकाराचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. हे पारितोषिक स्वीडिश संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

6. (D) मध्यप्रदेश
दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी मध्यप्रदेश राज्याच्या जबलपूर या शहरात दहाव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल लालजी टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

7. (B) लक्ष्य सेन
लक्ष्य सेन हा डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचा विजेता ठरला. त्याने नेदरलँड्सच्या अल्मेरे शहरात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात जापानच्या युसुके ओनोडेराला पराभूत केले.

8. (A) रशिया
रशियाच्या उलान-उडे शहरात जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

No comments