Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 14 October 2019

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : मंजूला रौप्यपदक! भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिची विजयी घोडदौड अखेर रशियाच्या एकतारिना पाल्टसेव्हा हिने रोखली.लाइट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने मंजू राणी हिला रौप…

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : मंजूला रौप्यपदक!
  • भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिची विजयी घोडदौड अखेर रशियाच्या एकतारिना पाल्टसेव्हा हिने रोखली.
  • लाइट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने मंजू राणी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली.
  • जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या हरयाणाच्या सहाव्या मानांकित मंजू राणीला दुसऱ्या मानांकित एकतारिनाकडून १-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. एम. सी. मेरी कोम (५१ किलो)जमुना बोरो (५४ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांना उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागल्यानंतर मंजू राणीने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती.

ऐतिहासिक कसोटीत विराटचा ‘Super 30’ क्लबमध्ये समावेश :
  • भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर 1 डाव आणि 137 धावांनी मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 11 वा मालिका विजय ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये. कर्णधार विराट कोहलीसाठीही हा सामना अतिशय महत्वाचा ठरला आहे.
  • कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाचा हा 50 वा सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करताना 254 धावा केल्या. याचसोबत विजयानंतर विराटचा Super 30 क्लबमध्ये समावेश झाला आहे.
  • तसेच कर्णधार या नात्याने पहिल्या 50 कसोटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा 30 वा विजय ठरला आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी क्रिकेटचा दादा’ :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे.
  • सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झालीतर तो या पदावर 2020 पर्यंत कार्यरत राहील. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिवतर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे. तसेच बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेस प्रारंभ :
  • उत्तरप्रदेश वनविभागाच्या सहकार्याने वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ (WWF-India) या संस्थेच्या वतीने गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेचा कार्यक्रम राबविण्यास बिजनौरमध्ये प्रारंभ केला गेला आहे.
  • ही गणना हस्तिनापूर वन्यजीवन अभयारण्य आणि नरोरा रामसार स्थळाच्या दरम्यान गंगा नदीच्या वरच्या पात्रात सुमारे 250 किलोमीटर लांबीच्या पात्रात केली जाणार आहे.

कोमोरोस देशाला 20 दशलक्ष डॉलरची LoC वाढवून देण्याची घोषणा :
  • उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू ह्यांनी 11 ऑक्टोबर 2019 रोजी कोमोरोस देशाला भेट दिली. संरक्षण आणि सागरी सहकार्य क्षेत्रात दोन्ही देशातले द्वैपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भारताने कोमोरोसला 20 दशलक्ष डॉलर एवढी पत मर्यादा (लाइन ऑफ क्रेडिट) वाढवून देण्याची घोषणा केली. कोमोरोस देशाचे राष्ट्रपती अझाली असौमनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.
  • दोन्ही देशात संरक्षण सहकार्यशिक्षणआरोग्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रात सहा करार झाले आहेत. एका करारानुसार भारत कोमोरोसला 2 दशलक्ष डॉलरची पतमर्यादा (LoC) देणार.
  • यावेळी उपराष्ट्रपतींना कोमोरोसचा द ऑर्डर ऑफ ग्रीन क्रीसेंट” नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राजधानी मोरोनी येथे 18 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी भारताने 41.6 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय सौर युती कार्याचौकट करारावर (International Solar Alliance Framework Agreement) स्वाक्षरी करण्याचा कोमोरोसने निर्णय घेतला आहे.

No comments