Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या शहरात असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) या संस्थेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे?
A) नवी दिल्ली, भारत
B) सोल, दक्षिण कोरिया
C) टोकियो, जापान
D) बिजींग, चीन
2) कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे?
A) विराट कोहली
B) रोहित शर्मा
C) कपिल देव
D) हरभजन सिंग
3) वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्थापना वर्ष कोणते आहे?
A) सन 1961
B) सन 1971
C) सन 1981
D) सन 1991
4) कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात तरुण कर्णधार कोण ठरला आहे?
A) सरफराज अहमद
B) अँड्र्यू स्ट्रॉस
C) रशीद खान
D) टटेंडा तायबू
5) “युद्ध अभ्यास 2019” हा भारत आणि ___________ या देशांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याची सुरुवात 5 सप्टेंबर 2019 रोजी झाली.
A) ब्रिटन
B) संयुक्त राज्ये अमेरिका
C) युरोपीय संघ
D) रशिया
6) कोणत्या सार्वजनिक बँकेनी ESICच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना त्याची थेट ई-देयक सेवा प्रदान करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) सोबत करार केला?
A) कॅनरा बँक
B) युनियन बँक ऑफ इंडिया
C) इंडियन बँक
D) भारतीय स्टेट बँक
7) कोणत्या साली संयुक्त राष्ट्रसंघ समुद्र कायदा परिषद (UNCLOS) हा करार अस्तित्वात आला?
A) सन 1958
B) सन 1984
C) सन 1994
D) सन 1999
उत्तरे
1. (B) सोल, दक्षिण कोरिया
असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) ही जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन मंडळांची (EMBs) सर्वात मोठी संघटना आहे. त्याची स्थापना दक्षिण कोरियाच्या सोंग-डू या शहरात 14 ऑक्टोबर 2013 रोजी झाली. आता त्याचे कायमस्वरूपी सचिवालय सोल (दक्षिण कोरिया) या शहरात आहे. जगभरात मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि सहभागी तत्त्वावर निवडणुका घेण्यात कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
2. (B) रोहित शर्मा
प्रसिद्ध एकशिंगी गेंडा (Greater One-Horned Rhinoceros) किंवा भारतीय गेंडा या धोक्यात असलेल्या प्राणी-प्रजातीच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय फलंदाज रोहित शर्मा ह्याने WWF इंडिया आणि अॅनिमल प्लॅनेट या संस्थांच्या भागीदारीने 'रोहित4राईनोज' मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यंदा 22 सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार्या जागतिक गेंडा दिनाचे औचित्य साधून अॅनिमल प्लॅनेट या दूरदर्शन वाहिनीवर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये रोहित शर्माने "असुरक्षित" प्रजातींचा नाश होण्यापासून बचाव करण्यासाठी कार्य करण्याचे वचन दिले. 2018 साली शर्मा गेंड्यांच्या संवर्धनासाठी WWF इंडियाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून सहभागी झाला.
3. (A) सन 1961
वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) ही एक आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था आहे, जी जगभरात वनसंपत्तीचे जतन करण्यावर तसेच पर्यावरणावर पडणारा मानवी प्रभाव कमी करण्यावर भर देते. संस्थेची स्थापना 29 एप्रिल 1961 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय ग्लांड (स्वित्झर्लंड) या शहरात आहे.
4. (C) रशीद खान
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज आणि नवनियुक्त कर्णधार राशिद खानने 5 सप्टेंबरला बांग्लादेशाच्या विरुद्धच्या कसोटीत एक नवा विक्रम केला आहे. राशिद खान कसोटी क्रिकेटचा आतापर्यंतचा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. राशिदचे वय 20 वर्षे 350 दिवस आहे. यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वेचा माजी कर्णधार टटेंडा तायबू याच्या नावावर होता.
5. (B) संयुक्त राज्ये अमेरिका
“युद्ध अभ्यास 2019” हा भारत आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याची सुरुवात 5 सप्टेंबर 2019 रोजी झाली. वॉशिंग्टन डीसी या शहराजवळ असलेल्या जॉइंट बेस लुईस मकार्ड या तळावर हा सराव चालू आहे, जो 18 सप्टेंबरपर्यंत चालणार. ही या सरावाची 15वी आवृत्ती आहे.
6. (D) भारतीय स्टेट बँक
दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्यात एक करारनामा झाला असून त्यानुसार बँक समाकलित आणि स्वयंचलित प्रक्रियेदवारे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ESICच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना त्याची थेट ई-देयक सेवा प्रदान करणार आहे.
7. (C) सन 1994
संयुक्त राष्ट्रसंघ समुद्र कायदा परिषद (United Nations Convention on Laws of the Sea -UNCLOS) (किंवा सागरी करारनामा संधि) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो जगातली महासागरांच्या वापरासंदर्भात तसेच व्यवसाय, पर्यावरण आणि सागरी नैसर्गिक स्त्रोतांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करण्याच्या संदर्भात देशांचे हक्क आणि जबाबदार्या परिभाषित करतो. 1982 साली या कराराला मान्यता मिळाली, ज्याने 1958 सालाच्या ‘कन्व्हेंशन ऑन हाय सीज’ या चतुष्पाद संधिची जागा घेतली. 1994 साली हा करार प्रभावी झाला.
No comments