Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 8 September 2019

प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस'पुरस्कार: बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार दिला गेला…

प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार :
  • बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिसपुरस्कार दिला गेला आहे. हा पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2019 रोजी इटलीमधील पापल बॅसिलिका ऑफ असिसी या ऐतिहासिक जागी झाला.
  • शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे. लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढविण्याकरिता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिसपुरस्कार सर्वप्रथम 1981 साली पोलिश कामगार नेते लेच वालेसा यांना देण्यात आला होता. दलाई लामामिखाईल गोर्बाचेव्ह आणि अँजेला मर्केल हे इतर काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे.

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार :
  • देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
  • अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुलमुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

गगनयानसाठी प्राथमिक निवड प्रक्रिया पूर्ण :
  • भारतीय व्यक्तीस अवकाशात पाठवण्याच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अवकाशवीरांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा भारतीय हवाई दलाने पूर्ण केला असून त्यात टेस्ट पायलट (वैमानिकां)ची निवड करण्यात आली आहे.
  • तर या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्यारेडिओलॉजी चाचण्याप्रयोगशाळेतील चाचण्यावैद्यकीय चाचण्यामानसिक चाचण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. प्राथमिक टप्प्यात 25 जणांची निवड केली असून यातून आणखी चाळण्या लावून 2-3 संभाव्य अवकाशवीरांची निवड केली जाणार आहे. तसेच यातून निवड केलेल्या व्यक्तींना नोव्हेंबरनंतर प्रशिक्षणासाठी रशियात पाठवले जाणार आहे.

बियांकानं मिळवलं पहिलंवहिलं ग्रँडस्लॅम’ :
  • कारकीर्दीतील 24व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे स्वप्न 15 व्या मानांकित कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कू हिच्यामुळे भंग पावले. तर बियांकाने अंतिम फेरीत सेरेनाला 6-3, 7-5 असे पराभूत केले.
  • तसेच पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने सुरूवातीचे गेम जिंकत सामन्यातील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलापण बियांकाने आपली लय कायम राखत सरळ दुसरा सेटही जिंकला. तर या विजयासह बियांका आंद्रेस्कूने कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.

फुटबॉलपटू सॅम्युएल इटोची निवृत्ती :
  • चार वेळा सवरेत्कृष्ट आफ्रिकन खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या कॅमेरूनच्या सॅम्युएल इटोने वयाच्या ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
  • ‘‘एका नव्या आव्हानासाठी मी इथेच थांबत आहे. पाठिंब्याबद्दल सर्वाचे आभार,’’ असे बार्सिलोनाइंटर मिलान आणि चेल्सीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इटोने सांगितले.

No comments