प्रत्यक्ष वेळेत ESICच्या लाभार्थ्यांना रक्कम देय करण्यासाठी SBI बरोबर भागीदारी : दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्यात एक करारनामा झाला असून त्यानुसार बँक समाकलित आणि स्…
प्रत्यक्ष वेळेत ESICच्या लाभार्थ्यांना रक्कम देय करण्यासाठी SBI
बरोबर भागीदारी :
- दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्यात एक करारनामा झाला असून त्यानुसार बँक समाकलित आणि स्वयंचलित प्रक्रियेदवारे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ESICच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना त्याची थेट ई-देयक सेवा प्रदान करणार आहे.
- या कराराच्या माध्यमातून, SBI त्याच्या कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (CMP) ई-पेमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मद्वारे ESICच्या एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग (ERP) प्रक्रियांसह ई-देयक पद्धतीची एकात्मता प्रदान करणार आहे.
- ESIC बद्दल कर्मचारी राज्य विमा ही भारतीय कामगारांसाठीची एक स्व-वित्तपोषित सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा योजना आहे. हा कोष ‘ESI कायदा-1948’ अन्वये कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे (Employees' State Insurance Corporation -ESIC) व्यवस्थापित केला जातो. ESIC ही भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करणारी एक वैधानिक संस्था आणि प्रशासकीय मंडळ आहे. त्याची स्थापना 24 फेब्रुवारी 1952 रोजी झाली.
अमेरिकन खुली
टेनिस स्पर्धा – नदाल आठव्यांदा उपांत्य फेरीत :
- ‘लाल मातीचा’ अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने हार्ड कोर्टवरही आपली जादू कायम राखली आहे. 5 सप्टेंबरला नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला आठव्यांदा धूळ चारून कारकीर्दीत आठव्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तर इटलीच्या मॅटिओ बेरेट्टिनीने फ्रान्सच्या गेल माँफिल्सला पराभवाचा धक्का देऊन नदालविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील स्थान पक्के केले.
- जवळपास 2 तास आणि 46 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या दुसऱ्या मानांकित नदालने अर्जेटिनाच्या 20 व्या मानांकित श्वार्ट्झमनला 6-4, 7-5, 6-2 असे पराभूत केले. नदालने यावर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या किमान उपांत्य फेरीत प्रवेश केला असून फ्रान्स टेनिस स्पर्धेत त्याने विजेतेपद मिळवले. तर ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन येथे त्याला अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
- या सामन्यादरम्यान नदालच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापतही झाली. परंतु त्याने हार न मानता दुखापतीवर उपचार करून सामना जिंकला. गतवर्षी हुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्धच्या उपांत्य लढतीत गुडघ्याच्या दुखापतीमुळेच नदालला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
झिम्बाब्वेचे
माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन :
- झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. १९८० ते २०१७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशाला आपल्या वज्रमुठीत दडपून ठेवले होते. श्वेतवर्णीय अल्पसंख्याकांच्या राजवटीतून ऱ्होडेशियाला मुक्त करणारा नेता अशी त्यांची ओळख होती पण नंतर त्यांनी स्वत: सत्ता राबवताना दडपशाही व भीती पेरण्याचे राजकारण केले. नंतर त्यांच्याच एकनिष्ठ लष्करशहांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली होती.
- झिम्बाब्वेचे संस्थापक व माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन झाले असून ही देशासाठी वेदनादायी घटना आहे असे इमर्सन मनागावा यांनी सांगितले. मुगाबे हे ऱ्होडेशियाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे प्रतीक होते व आफ्रिकेत त्यांची तीच सकारात्मक ओळख होती. त्यांनी देश व आफ्रिका खंडासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे इमर्सन यांनी सांगितले.
- नोव्हेंबर २०१७ मध्ये मुगाबे यांना अपमानास्पद पद्धतीने सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. पण नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. सिंगापूर येथे काही महिने त्यांना अज्ञात आजारामुळे रुग्णालयात ठेवण्यात आले होते पण बहुदा त्यांना पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग होता.
पंतप्रधान मोदी
यांना स्वच्छ भारत अभियानासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून पुरस्कार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या स्वच्छ भारत अभियान (एसबीए) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून पुरस्कार मिळणार आहेत. हा पुरस्कार त्यांना सप्टेंबर 2019 च्या उत्तरार्धात अमेरिकेच्या दौर्यादरम्यान प्रदान करण्यात येईल. देशातील सर्वांगीण स्वच्छता सुधारण्यासाठी आणि पाच वर्षांत देशभरात मुक्त शौचमुक्ती दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू केले होते.
- या घटकांमध्ये घरगुती शौचालये, समुदाय आणि सार्वजनिक शौचालये आणि घनकचरा व्यवस्थापन बांधकाम समाविष्ट आहे. मिशनचे दोन प्रमुख भाग म्हणजे – (1) स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण): हे केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयांतर्गत कार्यरत (2) स्वच्छ भारत अभियान (शहरी): हे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे.
रोहित शर्माची 'रोहित4राईनोज' मोहीम :
- प्रसिद्ध एकशिंगी गेंडा (Greater One-Horned Rhinoceros) किंवा भारतीय गेंडा या धोक्यात असलेल्या प्राणी-प्रजातीच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय फलंदाज रोहित शर्मा ह्याने WWF इंडिया आणि अॅनिमल प्लॅनेट या संस्थांच्या भागीदारीने 'रोहित4राईनोज' मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
- यंदा 22 सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार्या जागतिक गेंडा दिनाचे औचित्य साधून अॅनिमल प्लॅनेट या दूरदर्शन वाहिनीवर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये रोहित शर्माने "असुरक्षित" प्रजातींचा नाश होण्यापासून बचाव करण्यासाठी कार्य करण्याचे वचन दिले.
- आज जगात अंदाजे 500 एकशिंगी गेंडे शिल्लक आहेत, त्यापैकी 82 टक्के भारतात आढळतात. एकेकाळी सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र नदीच्या भूप्रदेशात मुबलक प्रमाणात आढळला गेलेला हा प्राणी आता केवळ आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात काही निवडक भागांमध्येच आढळतो. एकशिंगी गेंडा हा आसाम राज्याचा राज्य पशू आहे.
No comments