हिंदुस्तानातील 1857 चा उठाव हिंदुस्तानच्या इतिहासात 1857 च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. 1857 सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.
1857 च्या उठावाची विविध कारणे 1) राजकीय,सामाजिक,धार्मिक क…
हिंदुस्तानातील 1857 चा उठाव
हिंदुस्तानच्या इतिहासात 1857 च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. 1857 सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.
1857 च्या उठावाची विविध कारणे
1) राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणेराजकीय कारणे
तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.
डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण
सामाजिक कारणे:
- हिंदी लोकांना रानटी समजले जाई
- हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना
- हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.
धार्मिक कारणे:
- तिसरे संकट धर्मावर आले.
- समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया
2) आर्थिक, लष्करी कारणे
आर्थिक कारणे :
- हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.
- इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक
- शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी
लष्करी कारणे :
- हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.
- हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.
3) तात्कालिक कारण
हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी 1857 च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे 1857 रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.
1857 च्या उठाव अयशस्वी होण्याची कारणे :
- बंडाचा फैलाव सर्व हिंदुस्तानावर झाला नाही.
- हिंदी राजेरजवाड्यांचा पाठींब्याचा अभाव.
- बंडवाल्यांचा सर्वसामान्य नेता मिळू शकला नाही.
- सर्वमान्य ध्येयाचा व कार्यक्रमाचा अभाव
- हिंदी नेते लष्करी डावपेचात कमी पडले.
- साधनसामग्री, अनुभव व मनोधैर्य यात इंग्रज वरचढ
- उठावास जनतेचा पाठींबा पाहिजे तसा मिळाला नाही.
- बंडवाल्यांचा नेत्यात दुही होती
- आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल
1857 च्या उठावाची ठिकाणे
- दिल्ली - मीरत पासून दिल्ली ३० मैल अंतरावर आहे. ते अंतर काटून बंडवाले शिपाई दुसऱ्या दिवशी दिल्लीस आले. बहादुरशहा यास सिंहासनावर बसवून त्याची राजवट सुरु झाल्याची घोषणा त्यांना करावयाची होती. बादशहा हा नावाचाच बादशहा बनला होता. २४ तासात दिल्ली बंडवाल्यांच्या हाती आली. कालपर्यंत गुलाम असलेला बहादुरशहा त्यांनी हिंदूस्थानचा सम्राट बनवला. वास्तविक उत्तर हिंदुस्तानातील वेळची इंग्रजांची अवस्था मोठी नाजूक होती. परंतु इंग्रजांनी पंजाब वगैरे प्रदेशातून दिल्ली कडे फौजा गोळा केल्या. दिल्ली म्हणजे हिंदुस्तानची पूर्वापारची राजधानी आणि ती आपण काबीज केली. असा इंग्रजांचा अंदाज होता.
- प्रसिद्ध इतिहासकार थॉमसन व गरेट म्हणतात ' बंडाचा प्रारंभ तर यशस्वी झाला, पण उत्तर हिंदुस्तानातील इंग्रजांच्या नाजूक अवस्थेचा फायदा उठवणारा एकही कार्यक्षम नेता बंडवाल्याजवळ नव्हता हे लवकरच स्पष्ट झाले. १५ सप्टेंबर 1857 रोजी इंग्रज व बंडवाले यांच्यातील लढाईस तोंड फुटले. बंडवाल्यांनी इंग्रजी फौजांशी १० दिवस घेतले.
- कानपूर - कानपूर शहराचा विकास कंपनीच्या कारकिर्दीत झाला होता. कानपूर येथे इंग्रजी कंपनीच्या छावण्या असत. जवळच ब्राम्हवर्त येथे मराठ्यांचा पदच्युत पेशवा दुसरा बाजीराव याचे निवासस्थान होते. मृत्यूपूर्वी त्याने धोंडोपंत उर्फ नानासाहेब याला दत्तक घेतले. पण बाजीरावानंतर त्यास मिळणारा आठ लाखाचा तनखा, छोटी जहागीर, व पदव्या नानासाहेबास बहाल करण्यास इंग्रजी राज्यकर्त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे नानासाहेबाच्या हृदयात सुडाच्या अग्नी धुमसत होत्या पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे तूर्त त्याने नमते घेतले होते. आता सूड उगवण्याची आयती संधी चालून आली होती.
- १ जुलै रोजी नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. परंतु कानपूर हातातून गेल्याचे कळताच इंग्रजांनी तिकडे फौजा पाठविल्या होत्या. आणि या फौजांचा पराभव केल्याशिवाय नानासाहेबाची कानपूरमधील नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपुरावर नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपूरावर येण्यापुर्वीच नानासाहेबाने फौजेनिशी कूच करून त्याच्याशी लढाई दिली. पण नानासाहेब यांचा पराभव झाला.
- पुढे सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब व त्याचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपुरवर चाल केली व पुन्हा ताब्यात घेतले. त्यानंतर ६ डिसेंबर 1857 ला पळ काढावा लागला.
1857 च्या उठावाचे परिणाम :
कंपनीची राजवट बरखास्त झाली : स 1857 चा कायदा - रेग्युलेटिंग अक्ट हा कायदा इंग्लिश पार्लमेंटने पास केल्यापासून सरकारचे कंपनीच्या कारभारावरील कंपनीच्या कारभारावरील नियंत्रण वाढतच गेले होते.सरकारने 1857 साली खास कायदा मंजूर करून कंपनीची राजवट बरखास्त केली व तेथून पुढे हिंदुस्तानात इंग्लंडच्या राणीची राजवट सुरु झाल्याचे घोषित करण्यात आला. कंपनीचे सर्व भूदल व आरमार राणी सरकारकडे घेण्यात आले. राणीच्या वतीने हिंदुस्तानचा व्हाईसराय हा हिंदुस्तान सरकारचा कारभार पाहणार होता. पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर हि मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्यांचे मंडळ [ The secretary of state in council ] हा भारतमंत्री पार्लमेंटचा व ब्रिटीश मंत्रिमंडळाचा सभासद असे.
राणीचा जाहीरनामा : राज्यकर्त्यांचे उदार धोरण - 1857 च्या उठवातून इंग्रज राज्यकर्त्यांनी अनेक धडे घेतले. हिंदुस्तानातील असंतोषाची तीव्र जाणीव त्यांना उठावाने झाली. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान विषयक आपले धोरण बदलले. हे धोरण १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून व तेथे दरबार भरवून व तेथे राणीचा जाहीरनामा घोषित करून स्पस्ष्ट केले. राणीचा जाहीरनामा असा - [ आम्ही आता राज्यवृद्धीच्या उद्योगाला हात घालणार नाही, देशी संस्थानिकांचे हक्क, मानमरातब आणि प्रतिष्ठा यांचा आमच्याप्रमाणे मान राखू, त्यांनी व आमच्या प्रजेने समृद्धीत राहावे अशीच आमची इच्छा आहे. अंतर्गत शांतता व चांगले सरकार यामुळेच हिंदुस्तानात सामाजिक प्रगती घडून येईल. तसेच आम्ही जाहीर करतो की, देशी संस्थानिकांचे कंपनीशी जे करारदार झाले असतील ते येथून आम्ही पाळू. संस्थानिकांना आपल्या इच्छेनुसार दत्तक घेता येईल. त्यांची राज्ये विलीन केली जाणार नाहीत. धर्मासाठी कोणावर कृपा व अन्याय केला जाणार नाही. सरकार धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. सरकारी नोकऱ्या लायकी पाहून दिल्या जातील. धर्म, वर्ग, किंवा जात त्यांच्या मार्गात येणार नाहीत.
हिंदी लष्कराची पुनरचना करण्यात आली - 1857 चा उठाव प्रथम हिंदी लष्करात झाला, त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची पुनरचना करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
- संस्थानांसंबंधीच्या आक्रमक धोरणाचा त्याग
- इंग्रजांचे सामाजिक सुधारनासंबंधीचे धोरण बदलले
- इंग्रजी राजवटीबद्दल दहशत व तिरस्कार
- उठवपासून हिंदी लोकांनी घेतलेला धडा
- हिंदू मुसलमानमधील दरी वाढत गेली
- हिंदूस्थानचे परराष्ट्रीय धोरण इंग्लंडशी बद्ध झाले
- इंग्रजांची हिंदुस्तानवरील पकड घट्ट झाली
No comments