Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) वर्ष 2019 साठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाचा
विषय कोणता आहे?
A) लाइफस्टाइल अँड
पोषण
B) कॉम्प्लिमेंटरी
फीडिंग
C) पोषण, इज मस्ट
D) गुड फीड, गुड डेव्हलपमेंट
2) बांग्लादेशात 750 मेगावॅट क्षमतेचा गॅस-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या
भारतीय ऊर्जा कंपनीने जपानी JERA
कंपनीबरोबर भागीदारी केली?
A) रिलायन्स पॉवर
B) टाटा पॉवर
C) NTPC मर्यादित
D) अदानी पॉवर
3) कोणाकडे सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज
(AWEB) याचे अध्यक्षपद आहे?
A) रोमानिया
B) चीन
C) भारत
D) जापान
4) दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी भारतात कोणत्या शहरात एक AWEB केंद्र उभारले जाणार आहे?
A) मुंबई
B) कोलकाता
C) चेन्नई
D) नवी दिल्ली5) 100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __________ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.
A) सन 2020
B) सन 2021
C) सन 2022
D) सन 2023
6) इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (लंडन) याच्या वार्षिक ग्लोबल लाइव्हअॅबिलिटी इंडेक्स 2019 यानुसार कोणते शहर जीवन जगण्यास जगातले सर्वाधिक उत्तम शहर आहे?
A) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
B) मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
C) सिडनी, ऑस्ट्रेलिया
D) ओसाका, जापान
7) कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?
A) ओमान
B) पाकिस्तान
C) कतार
D) सौदी अरब
उत्तरे
1. (B) कॉम्प्लिमेंटरी फीडिंग
दिनांक 1 सप्टेंबर 2019 पासून सुरू होणारा संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशात ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून साजरा केला जात आहे. ‘कॉम्प्लिमेंटरी फीडिंग’ (म्हणजेच पूरक आहार) हा यावर्षीचा विषय आहे. हा पोषण
अभियानाचा एक भाग आहे. POSHAN (प्रधान मंत्री’ज ओव्हररीचिंग स्कीम फॉर होलीस्टिक नरीश्मेंट)
पोषण अभियान हा एक बहु-मंत्रालयीन सांघिक कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश्य सन 2020 पर्यंत कुपोषणाचे निर्मूलन करणे आहे. हा कार्यक्रम महिला व
बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवला जात आहे.
2. (A) रिलायन्स पॉवर
ढाकाजवळ मेघनाघाट
येथे 750 मेगावॅट क्षमतेचा
गॅस-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बांग्लादेशाच्या सरकारने रिलायन्स
पॉवर ऑफ इंडिया या कंपनीशी करार केला आहे. तसेच त्यासंदर्भात एक भागीदार करार
देखील केला गेला जो अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि जपानी वीज कंपनी JERA
यांच्यादरम्यान झाला.
3. (C) भारत
भारताचे मुख्य
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ
वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय
संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात
आले आहे. रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा
ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे
राहणार. भारतीय निवडणूक आयोगाने 3 सप्टेंबर 2019
रोजी बेंगळुरू या शहरात AWEBची चौथी आमसभा आयोजित केली होती. त्यादरम्यान
हा कार्यक्रम पार पडला.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी अशी घोषणा केली की
दस्तऐवज निर्मिती, संशोधन
आणि प्रशिक्षण
कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM)
या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे, जे निवडणुकीच्या उत्तमोत्तम पद्धती तयार
करणार आणि
क्षमता बांधणी वाढवण्याबद्दल कार्य करणार.
100 महिला सैनिकांची
पहिली तुकडी मार्च 2021 या काळापर्यंत
भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे
प्रशिक्षण डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण
होणार आहे.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (लंडन) याच्या वार्षिक ग्लोबल लाइव्हअॅबिलिटी इंडेक्स
2019 यानुसार, सलग दुसर्या वर्षी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया
देशाची राजधानी) हे शहर जीवन जगण्यास जगातले सर्वाधिक उत्तम शहर आहे.
त्याच्यापाठोपाठ मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) (दुसरा), सिडनी (ऑस्ट्रेलिया), ओसाका (जापान) यांचा क्रम लागतो आहे. व्हिएन्ना शहराला 100 पैकी 99.1 गुण मिळालेत.
कतार या फारसी
आखाती देशाकडे 2022 FIFA विश्वचषक या
स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. कतारमधल्या तीव्र उन्हामुळे प्रथमच ही स्पर्धा
हिवाळ्यात खेळविण्यात येणार आहे.
No comments