सुनील अरोरा: असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) याचे नवे अध्यक्ष : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले.सन 2…
- भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले.
- सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता. रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार. भारतीय निवडणूक आयोगाने 3 सप्टेंबर 2019 रोजी बेंगळुरू या शहरात AWEBची चौथी आमसभा आयोजित केली होती. त्यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.
- आमसभेने AWEBचे नवे उपाध्यक्ष म्हणून दक्षिण आफ्रिका या देशाचे ग्लेन व्ह्यूमा माशिनीनी तसेच नवे सरचिटणीस (महासचिव) म्हणून कोरिया प्रजासत्ताकचे जोंग्युन चोए यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली आहे.
- अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे, जे निवडणुकीच्या उत्तमोत्तम पद्धती तयार करणार आणि क्षमता बांधणी वाढवण्याबद्दल कार्य करणार.
आणखी पाच शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ :
- आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ अशा पाच सरकारी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली. दहा सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ दिला जाणार आहे. एकूण वीस संस्थांपैकी आत्तापर्यंत सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे.
- तज्ज्ञ समितीने प्रत्येकी 15 संस्थांची शिफारस ऑगस्ट महिन्यात केंद्रीय अनुदान आयोगाला केली होती. रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन संचालक मंडळाचे सदस्य असलेले क्रिया विद्यापीठ तसेच, बेंगळूरुमधील अझिम प्रेमजी विद्यापीठाला ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्याची शिफारस केंद्रीय अनुदान आयोगाने फेटाळली.
- तसेच गेल्या वर्षी तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींमधून मुंबई आणि दिल्ली आयआयटी तसेच, बेंगळूरुमधील इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर सोशल सायन्सेस या तीन सरकारी शिक्षण संस्थांना तर, खासगी क्षेत्रातील बिट्स पिलानी, मणिपूर उच्चशिक्षण अकादमी आणि रिलायन्स फाऊडेशन जिओ इन्स्टिटय़ूट या तीन शिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठता दर्जा’साठी निवड केलेली आहे.
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार :
- देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
- तसेच अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
जुलै 2019 मध्ये आठ मुख्य क्षेत्रांची वाढ 2.1% पर्यंत खाली आली आहे :
- सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आठ मुख्य उद्योगांची वाढ जुलै 2019 मध्ये घसरून 2.1% वर आली आहे. मुख्यत: कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि क्रूडमधील संकुचिततेमुळे ती झाली. जुलै 2018 मध्ये या आठ क्षेत्रांचा विकास 7.3% टक्क्यांनी झाला होता. शिवाय एप्रिल ते जुलै 2019-20 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.2% टक्क्यांनी घसरला आहे.
सप्टेंबर महिना: 'राष्ट्रीय पोषण माह'
- दिनांक 1 सप्टेंबर 2019 पासून सुरू होणारा संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशात ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून साजरा केला जात आहे. ‘कॉम्प्लिमेंटरी फीडिंग’ (म्हणजेच पूरक आहार) हा यावर्षीचा विषय आहे. हा पोषण अभियानाचा एक भाग आहे.
- माता आणि बालके सदृढ राहावी यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या अंतर्गत माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण (POSHAN) अभियान राबविले जाणार आहे.
- POSHAN (प्रधान मंत्री’ज ओव्हररीचिंग स्कीम फॉर होलीस्टिक नरीश्मेंट) पोषण अभियान हा एक बहु-मंत्रालयीन सांघिक कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश्य सन 2020 पर्यंत कुपोषणाचे निर्मूलन करणे आहे. हा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवला जात आहे.
- हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभियानादरम्यान प्रामुख्याने पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, अॅनेमिया आजार, वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहे.
No comments