Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणता खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन बळी घेणार्या भारतीय गोलंदाजांपैकी एक नाही?
A) जसप्रीत बुमराह
B) इरफान पठाण
C) हरभजन सिंग
D) ऋषभ पंत
2) कोणत्या व्यक्तिला बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्यावतीने ‘ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड’ हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे?
A) राम नाथ कोविंद
B) नरेंद्र मोदी
C) दिवंगत सुषमा स्वराज
D) वरीलपैकी कुणीही नाही
3) पूर्व चीन समुद्रातल्या वादग्रस्त बेटांवर गस्त घालण्यासाठी कोणता आशियाई देश एक विशेष पोलीस दल तैनात करणार आहे?
A) जापान
B) चीन
C) सिंगापूर
D) मलेशिया
4) पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा ‘समुद्रयान’ प्रकल्पाच्या माध्यमातून ______ मध्ये वास्तविकतेत उतरण्याची शक्यता आहे. चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) 'समुद्रयान' प्रकल्प राबववित आहे.
A) सन 2020-21
B) सन 2021-22
C) सन 2022-23
D) सन 2023-24
5) कोणता देश ‘अपाचे गार्डियन अटॅक हेलिकॉप्टर’ची निर्मिती करतो?
A) रशिया
B) चीन
C) संयुक्त राज्ये अमेरिका
D) इस्त्राएल
6) वर्तमानात भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत?
A) अर्जन सिंग
B) अरुप राहा
C) बी. एस. धानोआ
D) के. एल. कालिदास
उत्तरे
1. (D) ऋषभ पंत
भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक (सलग तीन गडी बाद करणे) घेऊन आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंद केला आहे. किंग्सटन (जमैका) येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्यादरम्यान बुमराहने हा विक्रम केला आहे. जसप्रीत हा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहच्या क्रिकेट कारकीर्दीतली ही त्याची पहिली हॅटट्रिक आहे. यापूर्वी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेतली होती. बुमराहने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत डेरेन ब्राव्होला झेलबाद केले. यानंतर तिसऱ्या चेंडूत शामराह ब्रुक्सला बाद केले. तर षटकात चौथ्या चेंडूत रोस्टन चेजलाही बाद करत बुमराहने नव्या विक्रमाची नोंद केली.
2. (B) नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियानाचे नेतृत्व आणि त्यांच्या वचनबद्धतेचा सन्मान करण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्यावतीने ‘ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड’ हा पुरस्कार दिला जाणार आहे.
3. (A) जापान
पूर्व चीन समुद्रातल्या वादग्रस्त बेटांवर गस्त घालण्यासाठी जापान सबमशीन गन आणि हेलिकॉप्टरांनी सज्ज असलेले एक विशेष पोलीस दल तैनात करणार आहे. सशस्त्र गटांचा दुर्गम बेटांवर बेकायदेशीर प्रवेश रोखण्यासाठी जापानच्या नॅशनल पोलीस एजन्सीने अतिरिक्त 159 अधिकार्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव मांडला. यावेळी प्रथमच पोलीसांनी त्या वादग्रस्त बेटांजवळ गस्त वाढवली. जापान आणि चीन या देशांच्या मधोमध काही निर्जन बेटे आहेत तसेच दक्षिण चीन समुद्रातल्या त्या बेटांवरून अनेक आग्नेय आशियाई देशांमध्ये वाद वाढत आहेत.
4. (B) सन 2021-22
सन 2021-22 मध्ये पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा असून त्यासंदर्भात ‘समुद्रयान’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) 'समुद्रयान' प्रकल्प राबववित आहे. सुमारे 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामधून तीन व्यक्तींसह सुमारे 6000 मीटर खोलीपर्यंत पाण्याखाली जाण्यास सक्षम असलेले जलयान तयार केले जात आहे. देशातच विकसित केल्या जात असलेल्या प्रस्तावानुसार समुद्राच्या तळाशी सहा किलोमीटरच्या खोलीवर 72 तास कार्य करू शकणारे जलयान तयार केले जात आहे. सध्या पाणबुडी केवळ 200 मीटरच्या खोलीपर्यंतच समुद्राखाली जाऊ शकते.
5. (C) संयुक्त राज्ये अमेरिका
दिनांक 03 सप्टेंबर 2019 रोजी अमेरिकी बनावटीचे 'अपाचे हेलिकॉप्टर' सेवेत दाखल झाले. पठाणकोट हवाई तळावर एका सोहळ्यात अपाचे हेलिकॉप्टरांना हातात घेण्यात आले आहेत. 2015 साली अपाचे हेलिकॉप्टरच्या खरेदीसंदर्भात अमेरिका आणि भारतात करार झाला होता. असे एकूण 22 हेलिकॉप्टर भारताला मिळणार आहेत. बोइंग AH-64 अपाचे हे जगातील सर्वात घातक हॅलीकॉप्टर मानले जाते. 'अपाचे हेलिकॉप्टर' हे बहुभूमिका बजावणारे एक लढाऊ हेलिकॉप्टर आहे आणि या श्रेणीतले हे जगातले सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे.
6. (C) बी. एस. धानोआ
चीफ ऑफ द एयर स्टाफ हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आणि कमांडर आहेत. चीफ मार्शल बी. एस. धानोआ हे वर्तमानातले भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत.
No comments