‘समुद्रयान’ प्रकल्पातून भारत खोल महासागरात खनिजांचा शोध घेणार : सन 2021-22 मध्ये पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा असून त्यासंदर्भात ‘समुद्रयान’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. चेन्नईची राष्ट…
‘समुद्रयान’ प्रकल्पातून भारत खोल महासागरात खनिजांचा शोध घेणार :
- सन 2021-22 मध्ये पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा असून त्यासंदर्भात ‘समुद्रयान’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) 'समुद्रयान' प्रकल्प राबववित आहे.
- सुमारे 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामधून तीन व्यक्तींसह सुमारे 6000 मीटर खोलीपर्यंत पाण्याखाली जाण्यास सक्षम असलेले जलयान तयार केले जात आहे. देशातच विकसित केल्या जात असलेल्या प्रस्तावानुसार समुद्राच्या तळाशी सहा किलोमीटरच्या खोलीवर 72 तास कार्य करू शकणारे जलयान तयार केले जात आहे. सध्या पाणबुडी केवळ 200 मीटरच्या खोलीपर्यंतच समुद्राखाली जाऊ शकते.
- ‘समुद्रयान’ प्रकल्प हा खोल समुद्रात खनिजांचा शोध घेण्यासाठी भु-शास्त्र मंत्रालयाच्या पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रतळाशी असलेल्या दुर्मिळ खनिजांचा शोध घेतला जाणार आहे आणि असा शोध घेणार्या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला ठेवणार आहे.
लिव्हरपूलचा व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी :
- लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. नुकत्याच झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19) व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.
- लिव्हरपूलला 2018-19 च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता. बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2012 मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.
- 28 वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले. गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.
ISSF शुटिंग वर्ल्ड कप – अभिषेक वर्माला सुवर्णपदक, सौरभ चौधरीला कांस्यपदक :
- ब्राझीलच्या रिओ दी जनेरो शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने 244.2 तर सौरभ चौधरीने 221.9 गुणांची कमाई केली.
- तुर्कीच्या इस्माईल केलेसने 243.1 गुणांसह रौप्यपदक कमावलं. 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आपला ऑलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चीत केला आहे. याव्यतिरीक्त 50 मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करत ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.
वैष्णो देवीच्या समाधीस देशाची ‘बेस्ट स्वच्छ आयकॉनिक प्लेस’ म्हणून जाहीर :
- जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावर माथा वैष्णो देवीच्या समाधीस देशाचे ‘बेस्ट स्वच्छ आयकॉनिक प्लेस’ असा दर्जा देण्यात आला आहे. 6 सप्टेंबर, 2019 रोजी पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ महोत्सव’ दरम्यान राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड यांना प्रदान करतील.
- स्वच्छ आयकॉनिक ठिकाणांच्या रँकिंगचे तरण जलशक्ती मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग यांनी केले. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येणार्या वैष्णोदेवी तीर्थक्षेत्राला केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून 2017 मध्ये सुवर्ण मंदिरानंतर दुसरा स्थान मिळाल्याबद्दल विशेष पुरस्कार मिळाला. 2018 मध्ये, इंडिया टुडे समूहाने तीर्थक्षेत्र सर्वात स्वच्छ धार्मिक स्थळ म्हणून घोषित केली.
- गेल्या काही वर्षांत संपूर्ण तीर्थक्षेत्राची स्वच्छता व्हावी यासाठी अनेक उपाययोजना केल्यामुळे माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्राने मंडळाच्या स्वच्छतेत होणाऱ्या एकूणच सुधारण्याच्या आधारे निर्णय घेण्यात आला आहे.
होमलोन होणार स्वस्त :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत.
- तर यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार आहेत. परिणामी, कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर रिझव्र्ह बँकेने आता सक्तीचा बडगा उगारला आहे.
- यापूर्वी अनेकदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी केले नाहीत. स्टेट बँकेसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.
- रिझव्र्ह बँकेने रेपो दर अनेकदा कमी करूनही व्यापारी बँका मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी करत नाही, अशी खंत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती. 1 एप्रिलपासून बँकांनी रेपो संलंग्न दर करण्याबाबत आवाहनही करण्यात आले होते. अखेर आता त्याबाबत सक्ती करण्यात आली आहे.
No comments