Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

भारताचा भूगोल

भारताचा भूगोल:
भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगा…

भारताचा भूगोल:
  • भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.
  • भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो.
  • भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.
  • भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे.
  • भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.
  • भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.
  • भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.
  • जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.
  • 21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.
  • जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.
  • के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.
  • कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळ च्या सीमेवार आहे.
  • भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.
  • देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.
  • भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.
  • भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.
  • लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.
  • चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.
  • देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे.
  • भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील
  • राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.
  • भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.
  • भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.
  • भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.
  • भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.
  • देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.
  • देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.
  • देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.
  • सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे:
1) भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी----शिरपूर , महाराष्ट्रा.
2) भारतातील पाहिले इ टेम्पल ---शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)
3) भारतातील पाहिले खाजगी विमानतळ---कोची(केरळ)
4) भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा--कोट्टायम(केरळ)
5) भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय----गाझियाबाद(उत्तरप्रदेश)
6) भारतातील पाहिले बायोटेक शहर--लखनौ(उत्तरप्रदेश)
7) भारतातील पाहिले इ कोर्ट---- --- बिहार.
8) भारतातील पाहिले इ पोस्ट------- पाटणा(बिहार)
9) भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प--काकीनडा (आंध्र प्रदेश)
10) भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग---पोसिंत्रा (गुजरात)
11) भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र---कोलकाता (प. बंगाल)
12) भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.
13) भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.

भारतात उन्हाळ्यात वाहणारे वारे:
  • उत्तर भारतात दुपारी अतिउष्ण व कोरडे वारे दुपारी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यांना लु असे म्हणून ओळखले जाते.
  • याच काळात ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये  वाहणाऱ्या उन्हाळी वाऱ्याना कालबैसाखी असे म्हणतात.
  • शेवटी या वार्यापासून केरळ व कानडा किनारपट्टी वर पडणाऱ्या पावसानं चेरी ब्लॉसम असे म्हणतात.
  • भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सुमारे 80 टक्के पाऊस मिळतो.

सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग:
  • एन एच 2, 6, 7 हे सर्वात जास्त राज्यातुन जाणारे महामार्ग आहेत. ते प्रत्यकी सहा राज्यातून जातात.
  • एन एच 2-- हा दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून जातो.
  • एन एच 6 -- हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून जातो.
  • एन एच 7 --- उत्तरप्रदेश, मध्येप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून जातो.

भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग:
  • N H 7:- वाराणसी, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, कन्याकुमारी.
  • N H 6:- हाजीरा, नागपूर, रायपूर, कोलकाता.
  • N H 5:- बहरगोरा, भुवनेश्वर, विजयवाडा, चेन्नई.
  • N H 15:- पठाणकोट, अमृतसर, बिकानेर, कंडला.
  • N H 2:- दिल्ली, आग्रा, कानपुर, बरही, कोलकत्ता.
  • N H 8:- दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई.
  • N H 17:- पनवेल, मंगलोर, कोझिकोड, एटापल्ली.
  • N H 4:- ठाणे, पुणे, बंगलोर, चेन्नई.
  • N H 3:- आग्रा, इंदोर, नाशिक, मुंबई.
  • N H 31:- बरही, पुणे, सिलिगुरी, अमिनगाव

भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग व त्यांच्या ठिकाणावर असलेली शहरे:
  • दिल्ली -  अमृतसर:- दिल्ली, अंबाला, जालंधर, अमृतसर.
  • जालंधर- श्रीनगर :- जालंधर, पठाणकोट, जम्मू, बनिहाल.
  • कोलकत्ता- दिल्ली- अमृतसर:- कोलकत्ता, वाराणसी, अलाहाबाद, कानपुर, आग्रा, दिल्ली, अंबाला, अमृतसर.
  • मुंबई -  आग्रा :- मुंबई, नाशिक, धुळे, इंदोर, ग्वाल्हेर, आग्रा.
  • मुंबई -  मद्रास:- मुंबई, पुणे, हुबळी, बंगळूर, मद्रास.
  • मुंबई - कोलकत्ता:- मुंबइ, नाशिक, धुळे, नागपूर, रायपूर, संभाळपुर, कोलकत्ता.
  • वाराणसी -- कन्याकुमारी:- वाराणसी, जबलपूर, नागपूर, हैद्राबाद, बंगळूर, सालेम, कन्याकुमारी.
  • दिल्ली--मुंबई:- दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, मुंबई.
  • पुणे--विजयवाडा:- पुणे, सोलापूर, हैद्राबाद, विजयवाडा

No comments