Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या राज्यात भारतातला सर्वाधिक लांबी असलेला विद्युतीकृत रेल बोगदा आहे?
A) आंध्रप्रदेश
B) हिमाचल प्रदेश
C) तामिळनाडू
D) केरळ
2) कुठे पाचवी ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया’ ही मत्स्यप्रदर्शनी भरविण्यात आली?
A) नवी दिल्ली
B) चेन्नई
C) हैदराबाद
D) मुंबई
3) सन 2018-19 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या मत्स्य उत्पादक देशांमध्ये भारताचा क्रमांक काय आहे?
A) प्रथम
B) द्वितीय
C) तिसरा
D) चौथा
4) कोणत्या सार्वजनिक बँकेनी MSME उद्योगांच्या ग्राहकांना भागीदारीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 2 सप्टेंबर 2019 रोजी ECL फायनान्स या कंपनीबरोबर करार केला?
A) बँक ऑफ इंडिया
B) स्टेट बँक ऑफ इंडिया
C) युनायटेड बँक ऑफ इंडिया
D) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
5) कोणत्या व्यक्तीने 01 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय लष्कराचे उप-प्रमुखपद सांभाळले?
A) लेफ्टनंट जनरल देवराज अंबू
B) लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे
C) लेफ्टनंट जनरल विक्रम बदाना
D) लेफ्टनंट जनरल सुनील लांबा
6) कोणत्या राज्याला दिंडीगुल कुलूप या उत्पादनासाठी GI टॅग मिळविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे?
A) तामिळनाडू
B) आंध्रप्रदेश
C) मध्यप्रदेश
D) केरळ
उत्तरे
1. (A) आंध्रप्रदेश
1 सप्टेंबर 2019 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेश राज्यात देशातल्या सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल बोगद्याचे उद्घाटन केले. आंध्रप्रदेश राज्याच्या चेरलोपल्ली आणि रापुरू या स्थानकांच्यादरम्यान तयार करण्यात आलेला हा 6.6 किलोमीटर लांबीचा बोगदा ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम रेल्वे मार्गाचा एक भाग आहे. नव्याने बांधण्यात आलेला हा बोगदा कृष्णापट्टनम बंदर आणि दुर्गम भागांच्या दरम्यान मालवाहतूक करण्यासाठी अखंड रेल जोडणी प्रदान करणार आहे.
2. (C) हैदराबाद
यंदा तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद या शहरामध्ये ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया 2019’ ही मत्स्यप्रदर्शनी भरविण्यात आली. 31 ऑगस्ट 2019 रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी त्या मत्स्यप्रदर्शनीचे उद्घाटन केले. ही प्रदर्शनी तीन दिवस चालली. ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया’ ही भारतात भरविण्यात येणारी आंतरराष्ट्रीय मत्स्यप्रदर्शनी आहे, जिचे आयोजन सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) या संस्थेच्यावतीने केले जाते.
3. (B) द्वितीय
भारत हा जगातला द्वितीय क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये भारताने 13.70 दशलक्ष मेट्रिक टन वजनी माशाचे उत्पादन घेतले. भारताला लाभलेली 7516.6 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि 3.9 दशलक्ष मेट्रिक टन वजनी क्षमतेचे मत्स्यपालन केले जाऊ शकणार्या सागरी स्त्रोतांसह भारतात समृद्ध विविधता असलेले विशाल सागरी स्त्रोत आहेत.
4. (D) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
2 सप्टेंबर 2019 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक बँकेनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम (MSME) उद्योगांच्या ग्राहकांना भागीदारीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ECL फायनान्स या कंपनीबरोबर करार केला. ECL फायनान्स ही एडलवीस फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीची उपकंपनी आहे. यंत्रसामग्री व व्यवसाय चालविण्यासाठी कर्जपुरवठा करणे हे या भागीदारीचे उद्दीष्ट आहे.
5. (B) लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे यांनी 01 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय लष्कराचे उप-प्रमुखपद सांभाळले. 31 ऑगस्ट 2019 रोजी पदभार सोडलेल्या लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्या जागेवर ही नियुक्ती झाली.
6. (A) तामिळनाडू
तामिळनाडूला दिंडीगुल कुलूप (लोखंडी कुलूप) आणि प्रसिद्ध कंदांगी साडी या उत्पादनांसाठी दोन GI टॅग दिले जाणार आहे. दिंडीगुल या शहरातल्या हार्डवेअर अँड स्टील फर्निचर वर्कर्स इंडस्ट्रीयल को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेला दिंडीगुल कुलूपासाठी तर कंदांगी साडीसाठी तामिळनाडू सरकारच्या हातमाग व वस्त्रोद्योग विभागास हे GI टॅग दिले जात आहे.
No comments