Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या साली प्रथम ‘लद्दाख मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली होती?
A) सन 2012
B) सन 2010
C) सन 2013
D) सन 2015
2) पुढील पाच ते सात वर्षांमध्ये सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी 130 अब्ज डॉलर एवढी रक्कम खर्च करण्याची भारत सरकारने योजना आखली आहे. या योजनेत पुढीलपैकी कोणत्या दलांचा समावेश करण्यात आला आहे?
A) नौदल आणि हवाई दल
B) हवाई दल आणि लष्कर
C) लष्कर आणि नौदल
D) हवाई दल, लष्कर आणि नौदल
3) कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?
A) जागतिक व्यापार संघटना
B) ASEAN
C) BRICS देश
D) बांग्लादेश
4) कोणत्या देशाच्या मंजुरीनंतर ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे?
A) बोलिव्हिया
B) ब्रुनेई
C) क्रोएशिया
D) कंबोडिया
5) “सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) विक्रम संपथ
B) श्री प्रह्लादसिंग पटेल
C) रीना बॅरॉन
D) व्यंकय्या नायडू
6) कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?
A) दिल्ली
B) राजस्थान
C) महाराष्ट्र
D) केरळ
उत्तरे
1. (A) सन 2012
‘लद्दाख मॅरेथॉन’ समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केले जाते. ही जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. ही मॅरेथॉन प्रथम सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. हा कार्यक्रम चार वर्गांमध्ये विभागला जातो; ते आहेत – 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज, 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर हाल्फ मॅरेथॉन आणि 7 किलोमीटर रन फॉर फन.
2. (D) हवाई दल, लष्कर आणि नौदल
पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर या दलांमधल्या ताफ्यांच्या आधुनिकीकरणासाठी 130 अब्ज डॉलर एवढी रक्कम खर्च करण्याची भारत सरकारने योजना आखली आहे.
3. (B) ASEAN
भारत आणि दहा-सदस्यीय आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) यांनी वस्तूंसंदर्भातल्या द्वैपक्षीय मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली आहे.
4. (C) क्रोएशिया
6 सप्टेंबर 2019 रोजी ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठरावाला क्रोएशियाने (मंजुरी देणारा 97वा देश) मान्यता दिल्यानंतर आता हा आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे. ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ कायदा हा जागतिक पातळीवर कचरा फेकण्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे. आता हा नवा कायदा 5 डिसेंबर 2019 रोजी जगभरात लागू केला जाणार आहे.
5. (A) विक्रम संपथ
विक्रम संपथ हे “सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” या पुस्तकाचे लेखक आहेत.
6. (D) केरळ
केरळ राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे.
No comments