Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 13 September 2019

डीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी :
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्ष…

डीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी :
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.
  • डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.

अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द :
  • अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात व्यापार चर्चा सुरू होणार असून त्याआधीच एक सकारात्मक निर्णय घेऊन अमेरिकेवर प्रभाव पाडण्याचा चीनचा प्रयत्न दिसून येत आहे.
  • अमेरिकेने व्यापार युद्धात दणका दिल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. चीन व अमेरिका यांच्यात गेले एक वर्षभर व्यापार युद्ध सुरू असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. बुधवारी चीनने एकूण १६ प्रवर्गातील अमेरिकी वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तो १७ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. अल्फाल्फा पेलेटमाशांचे खाद्यवैद्यकीय लिनियर प्रवेगकमोल्ड रिलीज एजंट या वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्यात आला आहे. यात सोयाबीनडुकराचे मांस यांचा समावेश मात्र केलेला नाही.

चांद्रयान-2 : इस्रोला मिळाली नासाची साथ
  • लक्ष्याच्या अगदी जवळ आल्यानंतर इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. या चांद्रायन मोहिमेत इस्रोला नासाचीही साथ मिळाली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी नासाने हॅलो’ असा संदेश पाठवला आहे.
  • नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी इस्रोकडूनही परवानगी मिळाली आहे. विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या आशा कमी होत आहेत. 14 दिवसांनंतर चंद्रावर रात्र होईल.
  • त्यावेळी विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करणं कठिण होईलअसंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. कॅलिफोर्निया येथे असलेल्या डीएसएम स्टेशनवरून लँडरला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली असल्याची माहिती स्कॉट टिल्ले यांनी दिली. 2005 मध्ये स्कॉट टिल्ले यांनी नासाच्या एका हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा शोध लावला होता. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. लँडरला सिग्नल पाठवल्यानंतर चंद्र रेडिओ रिफ्लेक्टरप्रमाणे काम करतो आणि तो सिग्नल पुन्हा पृथ्वीवर पाठवतो. 8,00,000 किलोमीटरच्या प्रवासानंतर तो सिग्नल डिटेक्ट करता येतोअसंही त्यांनी नमूद केलं

‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव कायद्यात रूपांतरित :
  • 6 सप्टेंबर 2019 रोजी ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठरावाला क्रोएशियाने (मंजुरी देणारा 97वा देश) मान्यता दिल्यानंतर आता हा आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे. ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ कायदा हा जागतिक पातळीवर कचरा फेकण्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे. आता हा नवा कायदा 5 डिसेंबर 2019 रोजी जगभरात लागू केला जाणार आहे.

बेसल प्रतिबंध करारनामा आणि दुरूस्ती
  • 1995 साली सर्व सदस्य देशांनी बेसल प्रतिबंध करारनामा स्वीकारला. हा करार घातक टाकावू पदार्थांच्या प्रतिकूल परिणामापासून मानवी आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या उद्देशाने तयार करण्यात आला आहे
  • सुधारित कायद्यानुसारआर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) समुहाचे सदस्य असलेल्या 29 श्रीमंत देशांकडून OECD-सदस्य नसलेल्या देशांकडे इलेक्ट्रॉनिक कचरा तसेच जीर्ण झालेले जहाज याच्यासोबतच घातक टाकावू पदार्थांची सर्वप्रकाराची निर्यात करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
  • या करारात किरणोत्सर्गी टाकावू पदार्थांच्या दळणवळणाची बाबी समाविष्ट करण्यात आलेली नाही.

No comments