Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) प्रस्तावित प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) या समूहात किती देशांचा समावेश आहे?
A) 25
B) 21
C) 16
D) 17
2) कोणत्या पुरुष टेनिसपटूने यूएस ओपन 2019 ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
A) रॉजर फेडरर
B) राफेल नदाल
C) अँडी मरे
D) यापैकी कुणीही नाही
3) कोणती व्यक्ती ‘बलून फिएस्टा 2019’ या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे?
A) श्रीरंग जाधव
B) संग्राम पवार
C) प्रकाश पवार
D) युसूफ हमीद
4) 76 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला?
A) अटलांटिस
B) डार्लिंग
C) यू विल डाय अॅट 20
D) अबाऊट एंडलेसनेस
5) इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 या शर्यतीचे विजेतेपद कोणी पटकावले?
A) सामी बौजिला
B) वाल्टेरी बोटास
C) चार्ल्स लेकलर्क
D) लेविस हॅमिल्टन
6) कोणती संस्था लद्दाखमध्ये आयोजित होणारी जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन प्रायोजित करते?
A) भारतीय क्रिडा प्राधिकरण
B) युनियन हिल डेव्हलपमेंट कौन्सिल
C) लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल
D) लद्दाख क्रिडा प्राधिकरण
उत्तरे
1. (C) 16
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्या दरम्यानचा एक प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. नोव्हेंबर 2012 साली कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली.
2. (B) राफेल नदाल
2019 यूएस ओपन (किंवा अमेरिकन ओपन) ही टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क शहरात बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे आऊटडोर हार्ड कोर्टवर नुकतीच खेळली गेली. स्पेनच्या राफेल नदालचे हे 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला पराभूत केले. त्याने चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.
3. (B) संग्राम पवार
भारतीय हवाई दलाचे कॅप्टन संग्राम पवार हे अमेरिकेत होणार्या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
4. (A) अटलांटिस
व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 या कार्यक्रमामध्ये टॉड फिलिप्स दिग्दर्शित “जोकर” या चित्रपटाने “गोल्डन लायन” पुरस्कार जिंकला. तर व्हॅलेंटाईन वास्यानोविच दिग्दर्शित “अटलांटिस” या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
5. (C) चार्ल्स लेकलर्क
चार्ल्स लेकलर्क (फेरारी) याने इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 फॉर्म्युला वन मोटार शर्यतीचे विजेतेपद पटकावले.
6. (C) लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल
7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती. हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.
No comments