ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ आहे: THEविश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020 लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.भारतीय विज्ञान सं…
ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ आहे: THE विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020
- लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. मात्र या यादीत कोणत्याही भारतीय संस्थेला प्रथम 300 मध्ये जागा मिळविण्यात यश आलेले नाही. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.
आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन: 12 सप्टेंबर
- ‘दक्षिण-दक्षिण सहकार्या’चे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा दरवर्षी 12 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळते.
- 2019 सालासाठीचा दिन विषय - “फ्रॉम कमिटमेंट टू अॅक्शन – फॉलो अप टू ब्युनोस एरर्स प्लान ऑफ अॅक्शन+40”
- दक्षिण-दक्षिण सहकार्य म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडविण्यासाठी दक्षिणेकडील विकसनशील प्रदेश आणि देशांदरम्यानचे सहकार्य होय.
- इतिहास: दक्षिण-दक्षिण सहकार्याचा इतिहास हा 1949 सालापासून सुरू झाला जेव्हा इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल (ESC) याच्यावतीने प्रथम संयुक्त राष्ट्रसंघ तांत्रिक सहाय्य कार्यक्रमाची स्थापना केली गेली आणि 1969 साली संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थेची स्थापना केली गेली होती.
- पुढे 1978 साली या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 138 सभासदांनी "ब्युनॉस एरिस प्लान ऑफ अॅक्शन फॉर प्रोमोटिंग अँड इंप्लिमेंटिंग टेक्निकल को-ऑपरेशन अमंग डेव्हलपींग कंट्रीज (BAPA)” या योजनेचा अंगिकार केला होता. त्याच्या स्मृतीत ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ (International Day for South-South Cooperation) पाळला जातो.
- BAPA योजनेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त 20-22 मार्च 2019 रोजी अर्जेटिनामध्ये दक्षिण-दक्षिण सहकार्य विषयावरील संयुक्त राष्ट्रसंघाची द्वितीय उच्चस्तरीय परिषद (BAPA+40) संपन्न झाली. म्हणूनच यावर्षीचा विषय योजनेच्या BAPA+40 मध्ये स्वीकारल्या गेलेल्या वचनबद्धतेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात आला आहे.
नवजात कृष्ण विवरातील गुरुत्वीय लहरी शोधण्यात यश :
- नवजात कृष्णविवरातून बाहेर पडलेल्या गुरुत्वीय लहरी शोधण्यात संशोधकांना प्रथमच यश आले असून त्यातील चक्राकार प्रारूपामुळे कृष्णविवराचे वस्तुमान व त्याची फिरण्याची पद्धत व दिशा यावर माहिती मिळाली आहे. तसेच आइस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरील पुराव्यात त्यामुळे मोलाची भरही पडण्याची शक्यता आहे.
- फिजिकल रिव्ह्य़ू लेटर्स या नियतकालिकात म्हटले आहे, की कृष्णविवराचे वस्तुमान, फि रण्याची पद्धत व गती, विद्युत भार हे प्रमुख निरीक्षणक्षम घटक असतात हे यातून दिसून आले आहे. आइनस्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतात म्हटल्यानुसार ठरावीक वस्तुमान व गती असलेल्या कृष्णविवराचा क्षय हा विशिष्ट पद्धतीने होत असतो.
- तर मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अमेरिकी संस्थेतील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांनी या कृष्णविवराची चक्राकार गती, वस्तुमान याबाबत अंदाज मांडला आहे. त्यात अल्बर्ट आइनस्टाइन यांनी माडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा आधार घेण्यात आला होता. आताची ही गणने यापूर्वी कृष्णविवराची जी मापने करण्यात आली होती त्याच्याशी जुळणारी आहेत.
पुढच्या चार दिवसात ‘विक्रम’ बद्दल समजणार ठोस माहिती :
- पुढच्या चार दिवसात ‘विक्रम’बद्दल ठोस माहिती समजू शकते. नासाने 2009 साली चंद्रावर शोध मोहिमेसाठी पाठवलेला ऑर्बिटर 17 सप्टेंबरला विक्रमचे लँडिंग झाले त्या भागातून जाणार आहे.
- तर या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने 40 वर्षापूर्वीच्या मानवी चंद्र मोहिमेच्या पावलाचेही फोटो पाठवले होते. त्यामुळे विक्रमची माहिती मिळण्याची शक्यता वाढली आहे.
राणी रामपालकडे भारताचे नेतृत्व :
- आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे 27 सप्टेंबरपासून मारलो येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
- 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान रंगणाऱ्या या दौऱ्यासाठी 18 जणींच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील सविता आणि रजनी इथिमारपू यांनी आपले स्थान कायम राखले आहे.
- तर बचावपटू दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रीना खोखार आणि सलिमा टेटे यांनीही स्थान मिळवले आहे. मधल्या फळीत अनुभवी नमिता टोप्पो हिने दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे.
दिल्ली विद्यापीठावर ‘अभाविप’चा झेंडा :
- दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली आहे. अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर एबीव्हीपीने विजय मिळवला आहे.
- तर नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) सचिवपदावर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अभाविपचा ३-१ असा विजय झाला आहे. अभाविप ही आरएसएसशी, एनएसयुआय ही काँग्रेसशी तर आयसा ही डाव्यांशी संबंधीत विद्यार्थी संघटना आहे.
No comments