Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?
A) दिल्ली
B) राजस्थान
C) महाराष्ट्र
D) केरळ
2) भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____________ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.
A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना
B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली
C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट
3) कोणत्या देशाच्या मंजुरीनंतर ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे?
A) बोलिव्हिया
B) ब्रुनेई
C) क्रोएशिया
D) कंबोडिया
4) कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?
A) 2025
B) 2035
C) 2030
D) 2027
5) कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?
A) मोतिहारी आणि अमलेखगंज
B) सबा आणि सारवाक
C) हजीरा आणि विजयपूर
D) ताशकंद आणि बिश्केक
6) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळला जातो?
A) 11 सप्टेंबर
B) 12 सप्टेंबर
C) 13 सप्टेंबर
D) 10 सप्टेंबर
7) ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ या यादीत कोणत्या विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे?
A) ऑक्सफोर्ड विद्यापीठ
B) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
C) केंब्रिज विद्यापीठ
D) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
उत्तरे
1. (D) केरळ
केरळ राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे.
2. (B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली
10 सप्टेंबर रोजी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले. ही 60 किमी लांबीची मोतिहारी-अमलेखगंज पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे.
3. (C) क्रोएशिया
6 सप्टेंबर 2019 रोजी ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठरावाला क्रोएशियाने (मंजुरी देणारा 97वा देश) मान्यता दिल्यानंतर आता हा आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे. ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ कायदा हा जागतिक पातळीवर कचरा फेकण्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे. आता हा नवा कायदा 5 डिसेंबर 2019 रोजी जगभरात लागू केला जाणार आहे.
4. (C) 2030
दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे दोन घटक आहेत – 2025 सालापर्यंत रोगांवर नियंत्रण आणणे; 2030 सालापर्यंत पाय व मुखरोगांचे (FMD) निर्मूलन करणे.
5. (A) मोतिहारी आणि अमलेखगंज
10 सप्टेंबर रोजी भारताने नेपाळमध्ये मोतिहारी-अमलेखगंज पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे संयुक्तपणे उद्घाटन केले. ही दक्षिण आशिया प्रदेशातली 60 किमी लांबीची पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे. वार्षिक 2 दशलक्ष मेट्रिक टन एवढी या पाइपलाइनची क्षमता आहे.
6. (B) 12 सप्टेंबर
‘दक्षिण-दक्षिण सहकार्या’चे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा दरवर्षी 12 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळते. दक्षिण-दक्षिण सहकार्य म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडविण्यासाठी दक्षिणेकडील विकसनशील प्रदेश आणि देशांदरम्यानचे सहकार्य होय.2019 सालासाठीचा दिन विषय - “फ्रॉम कमिटमेंट टू अॅक्शन – फॉलो अप टू ब्युनोस एरर्स प्लान ऑफ अॅक्शन+40”
7. (A) ऑक्सफोर्ड विद्यापीठ
लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे. ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ जगातले सर्वोत्तम विद्यापीठ ठरले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे.
No comments