चंद्रमोहीमेच्या संदर्भात ISRO इस्राएलच्या SpaceIL सोबत करार करणार : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था चंद्रमोहीमेच्या संदर्भात इस्राएल देशाच्या SpaceIL या खासगी अंतराळ केंद्रासोबत करार करणार आहे. दोन्ही…
चंद्रमोहीमेच्या संदर्भात ISRO इस्राएलच्या SpaceIL सोबत करार करणार :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था चंद्रमोहीमेच्या संदर्भात इस्राएल देशाच्या SpaceIL या खासगी अंतराळ केंद्रासोबत करार करणार आहे. दोन्ही देशांच्या संस्था संयुक्तपणे चंद्रमोहीमेच्या अपयशाचा तपास करून त्याची कारणे शोधण्यासाठी हा करार करणार आहे.
- भारताच्या चंद्रयान-2 प्रमाणेच इस्राएलच्या चंद्रमोहीमेतही अखेरच्या क्षणी अडथळे आले होते. इस्राएलचे चंद्रयान अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले होते. या यानाला अपघात झाला होता.
- इस्त्राएलची ‘बेरेशीट’ चंद्रमोहीम: इस्त्राएलच्या SpaceIL या खासगी कंपनीचे ‘बेरेशीट’ नावाचे अंतराळयान 21 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर सोडण्यात आले होते. इस्राएलचे हे यान याच वर्षी 11 एप्रिलला चंद्रावर उतरणार होते. लँडिंगच्या आधी काही क्षण इंजिनचे काम बंद पडले. हे इंजिन सुरू करण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला पण मग त्यांचा लँडरशी संपर्क तुटला आणि पुढील काही सेंकदातच इस्त्राएलचे हे अंतराळयान कोसळले.
- दरम्यान चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांमध्ये इस्त्राएल या देशाचा 7 वा क्रमांक आहे. आतापर्यंत चंद्रावर जाणाऱ्या देशांमध्ये रशिया, अमेरिका आणि चीनचा समावेश आहे. इस्त्राएलच्या या मोहिमेसाठी तब्बल दहा कोटी डॉलर खर्च झाले आहेत.
NBFC कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी IFC आणि FIDC यांच्यात सामंजस्य करार :
- जागतिक बँक समूहाचा भाग असलेले आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाने (IFC) देशातल्या बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य करण्यासाठी भारताच्या भांडवल व कर्जासाठी वित्तपुरवठा करणार्या ‘वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)’ या मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.
- या कराराच्या अंतर्गत NBFC कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम "कमर्शियल क्रेडिट रिपोर्टिंग" या घटकावर आयोजित केले जातील, ज्याचा कंपन्यांची क्षमता वाढविणे आणि पट विभागांमधील कमर्शियल क्रेडिट इन्फॉर्मेशन डेटाचा तपास करणे हा उद्देश आहे.
- हा प्रशिक्षण कार्यक्रम IFCच्या मार्गदर्शनाखाली भारतातल्या विविध केंद्रांवर आयोजित केला जाणार आहे. कार्यक्रमात मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या सदस्यांना ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या पत गरजा पूर्ण करण्याविषयी जागृती, कौशल्य आणि व्यवसायिकता यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ :
- लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. मात्र या यादीत कोणत्याही भारतीय संस्थेला प्रथम 300 मध्ये जागा मिळविण्यात यश आलेले नाही. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.
- जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गतवर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र यंदा 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे.
- नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, जेव्हा की जुन्या संस्था 401-500 गटात आढळून येत आहेत. पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत.
‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ला सुरुवात झाली :
- दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला. केंद्र सरकारने या योजनेसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2024 सालापर्यंत 12,652 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
- प्राण्यांमध्ये आढळून येणार्या पाय व मुखरोग (FMD) या धोकादायक रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरातल्या गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे अश्या 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करणे हे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. शिवाय ब्रुसेलोसिस रोगाविरूद्धच्या लढाईत दरवर्षी 36 दशलक्ष गायीच्या मादा वासरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.
No comments