वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर : कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global in…
वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर :
- कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला.
- त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारत 52 व्या क्रमांकावर आहे. यादीमध्ये स्वित्झर्लंड अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ स्विडन, अमेरीका, नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर, जर्मनी आणि इस्राएल या देशांचा क्रम लागतो आहे.
सौदी अरेबियातून तेलपुरवठा घटणार :
- येमेनच्या हूथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन तेलप्रकल्पांवर ड्रोन हल्ले केल्याने दोन्ही ठिकाणी तेलउत्पादन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सौदी अरेबियाकडून जगाला होणाऱ्या तेलनिर्यातीत निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.
- सौदी अरेबियाने तेलपुरवठा त्वरित पूर्ववत न केल्यास, खनिज तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिबॅरल १०० डॉलपर्यंत उसळू शकतात, असा विश्लेषकांचा होरा आहे. तसे झाल्यास तेल आयातीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसमोर बिकट आर्थिक संकट उद्भवू शकते.
चंद्र मोहिमांमध्ये अमेरिका २६ तर रशिया १४ वेळा अपयशी :
- सर्वप्रथम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. पण पायोनिअरचे प्रक्षेपण अपयशी ठरले. १९६४ साली अमेरिकेच्या रेंजर ७ मिशनच्यावेळी पहिल्यांदा चंद्राचा जवळून फोटो काढण्यात आला.
- रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला. या मिशननंतर पाच महिन्यांनी मे १९६६ मध्ये अमेरिकेने सुद्धा अशाच प्रकारची मोहिम यशस्वी केली. १९६९ साली अमेरिकेचे अपोलो ११ मिशन तर ऐतिहासिक ठरले. त्यावेळी पहिले मानवी पाऊल चंद्रावर पडले.
- १९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या. १९८० ते ८९ या काळात चंद्रावर जाण्याची ही स्पर्धा थांबली. जपान, युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्रायलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. २००९ ते २०१९ या काळात एकूण दहा चंद्र मोहिमा झाल्या.
सौरभ वर्माला विजेतेपद :
- भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रविवारी व्हिएतनाम खुल्या ‘बीडब्लूएफ टूर सुपर १००’ बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित सौरभने झियांगला २१-१२, १७-२१, २१-१४ असे तीन गेममध्ये पराभूत केले.
- सौरभचे हे या वर्षांतील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने या वर्षी हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या सौरभने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले.
हिंदी दिन 2019: 14 सप्टेंबर
- हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी हिंदी भाषेत कविता, निबंध लेखन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या राष्ट्र आणि मातृभाषाबद्दल जागरूक करणे होय.
- हिंदी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. 2011च्या जनगणनेनुसार मातृभाषा म्हणून हिंदी वापरणारे भारतात 43.6 टक्के भाषिक आहेत. भाषेमध्ये अवधी, ब्रज आणि खडी बोली यासारखे देखील इतर प्रकार आहेत.
नवे ‘वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व’ (SSR) धोरण :
- भारत सरकारने ‘वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व’ (SSR) धोरणाचा मसुदा तयार केला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) याच्या धर्तीवर या प्रकाराचे धोरण तयार करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरणार आहे.
- देशातल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञान संस्था तसेच स्वतः शास्त्रज्ञांना विज्ञानाच्या प्रसाराच्या कार्यात सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विज्ञानाला समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी असा पुढाकार घेतला जात आहे.
No comments