Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळला जातो?
A) 11 सप्टेंबर
B) 12 सप्टेंबर
C) 13 सप्टेंबर
D) 10 सप्टेंबर
2) ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ या यादीत कोणत्या विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे?
A) ऑक्सफोर्ड विद्यापीठ
B) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
C) केंब्रिज विद्यापीठ
D) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
3) कोणत्या व्यक्तीची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
A) राजीव कुमार
B) कलराज मिश्रा
C) डॉ. प्रमोद कुमार मिश्रा
D) विजय कुमार
4) कोणत्या व्यक्तीने पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे?
A) विनीत जैन
B) जयदीप शंकर
C) अजय कुमार
D) पी. के. सिन्हा
5) MPATGM याचे पूर्णनाव काय आहे?
A) मल्टी पर्पज अँटी-टँक जिओ मिसाईल
B) मॅन पोर्टेबल अँटी-टँक जिओ मिसाईल
C) मल्टी पर्पज अँटी-टँक गाईडेड मिसाईल
D) मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल
6) ARIIA याचे पूर्ण नाव काय आहे?
A) अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
B) एव्रेज रँक्स ऑफ इंस्टीट्यूशन्स इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
C) एव्रेज रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एव्हिएशन
D) अटल रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एस्ट्रॉनॉमी
7) 13 सप्टेंबरला कोणत्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाची 166 वी जयंती साजरी करण्यात आली?
A) हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम
B) मार्टिनस बेन्जेरिन्क
C) सेलमॅन वाक्समन रोनाल्ड रॉस
D) फॅनी हेसे
उत्तरे
1. (B) 12 सप्टेंबर
‘दक्षिण-दक्षिण सहकार्या’चे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा दरवर्षी 12 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळते. दक्षिण-दक्षिण सहकार्य म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडविण्यासाठी दक्षिणेकडील विकसनशील प्रदेश आणि देशांदरम्यानचे सहकार्य होय.2019 सालासाठीचा दिन विषय - “फ्रॉम कमिटमेंट टू अॅक्शन – फॉलो अप टू ब्युनोस एरर्स प्लान ऑफ अॅक्शन+40”
2. (A) ऑक्सफोर्ड विद्यापीठ
लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे. ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ जगातले सर्वोत्तम विद्यापीठ ठरले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे.
3. (C) डॉ. प्रमोद कुमार मिश्रा
पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 11 सप्टेंबर 2019 रोजी पदभार स्वीकारला. डॉ. मिश्रा यांना कृषी, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा, पायाभूत वित्तपुरवठा, नियमनासंदर्भात बाबी विषयक कार्यक्रम व्यवस्थापनाचा अनुभव आहे. संशोधन, प्रकाशन, धोरण आखणे, कार्यक्रम/ प्रकल्प व्यवस्थापन यामध्येही त्यांची उत्तम कारकीर्द आहे. धोरण निर्मिती आणि प्रशासनामधला त्यांना दांडगा अनुभव आहे.
4. (D) पी. के. सिन्हा
11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान कार्यालयाचे OSD म्हणून सध्या काम पाहत असलेले पी. के. सिन्हा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. 13 जून 2015 ते 30 ऑगस्ट 2019 या काळात सिन्हा यांनी कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिले आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा नौवहन क्षेत्रात काम केले आहे. ऊर्जा, पायाभूत आणि वित्त क्षेत्रात त्यांचे प्राविण्य आहे.
5. (D) मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनी (DRDO) 9 सप्टेंबर 2019 रोजी आंध्रप्रदेश राज्याच्या कर्नूल येथे देशातच विकसित केलेल्या मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) याची यशस्वी चाचणी घेतली.
6. (A) अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
मनुष्यबल विकास मंत्रलयाकडून अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (ARIIA) 2020 या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
7. (A) हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम
13 सप्टेंबर रोजी जीवाणू ओळखण्यासाठी ‘ग्राम स्टेन’ पध्दती विकसित करणारे डेन्मार्कचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम यांची 166 वी जयंती सजरी केली गेली. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1853 रोजी झाला होता.
No comments