ग्लोबल AMR R&D हब या गटात भारत सामील : ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी भारत सामील झाला. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातल्या जैवतंत्रज्ञान विभागाने यासंबं…
- ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी भारत सामील झाला. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातल्या जैवतंत्रज्ञान विभागाने यासंबंधी घोषणा केली.
- जगापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सहयोगासाठी कार्यरत असलेल्या या भागीदारीत आता 16 सदस्य देश, युरोपियन कमिशन, दोन स्वयंसेवी फाऊंडेशन आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था (निरीक्षक म्हणून) आहेत.
- ग्लोबल AMR R&D हब: मे 2018 मध्ये ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हबची स्थापना करण्यात आली. वैश्विक जिवाणूरोधी प्रतिकारक क्षमतेसंबंधी संशोधन व विकासामध्ये आंतर-क्षेत्रीय सहयोगामधली तफावत, संभाव्यता ओळखून त्यासाठी संसाधनांच्या वाटपासंबंधी वैश्विक प्राधान्यकृत व्यवस्था आणि पुराव्यावर आधारित निर्णयाला हा आंतरराष्ट्रीय गट समर्थन देतो.
- या गटाच्या कार्यांना बर्लिनमध्ये स्थापित केलेल्या सचिवालयातून आणि सध्या जर्मनीच्या फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (BMBF) आणि फेडरल मिनिस्ट्री ऑफ हेल्थ (BMG) कडून वित्तपुरवठा केला जात आहे.
- औषधांच्या विरोधात जिवाणूंची वाढती प्रतिरोधक क्षमता हा आज वैश्विक मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे औषधांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.
डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेसशी जोडण्याची सरकारची योजना :
- डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेस म्हणजेच नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) याच्याशी जोडण्यासाठी तयार करण्याची भारत सरकारची योजना आहे.
- नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) यावर खात्यांची संपूर्ण माहिती इमिग्रेशन एंट्री, बँकिंग आणि फोन क्रमांक अश्या विविध बाबींविषयीची माहिती संकलित केली जाणार.
- NATGRID बाबत: नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) या प्रकल्पाची सुरूवात 2009 साली करण्यात आली. दूरसंचार, करासंबंधी अहवाल, बँक, इमिग्रेशन यासारख्या 21 संघांच्या 10 कार्यालयांकडून या व्यासपीठावर माहिती गोळा केली जाते. गुप्तचर विभाग (IB), रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW) यासारख्या सुमारे 10 केंद्रीय संस्था त्यामधली साठविलेली माहिती सुरक्षित मार्गाने प्राप्त करतात.
भारताच्या तेल पुरवठ्यात कपात नाही – सौदी अरेबिया :
- भारत हा सौदी अरेबियाचा तिसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार राष्ट्र असल्याने, भारताला करण्यात येत असलेल्या पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले असल्याची माहिती भारताच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे.
- ड्रोन हल्ल्यामुळे प्रतिदिन 5.7 दशलक्ष बॅरेल इतके तेल उत्पादन करत असलेल्या सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात निम्म्याने घसरण झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या 83 टक्के तेल सौदीकडूनच आयात करतो. इराकनंतर सौदी अरेबिया हा त्यांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. वर्ष 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने 40.33 दशलक्ष टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. त्यावेळी देशाने 207.3 दशलक्ष टन तेल आयात केले होते.
स्टीव्ह स्मिथचा अनोखा ‘षटकार’; अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच :
- अॅशेस 2019 मध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.
- स्मिथने अॅशेस मालिकेतील 4 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. एका सामन्यात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पण त्याने केलेल्या 4 सामन्यात त्याने तब्बल 774 धावा केल्या. महत्वाचे म्हणजे त्याने सलग 6 डावात 80 पेक्षा अधिक धावा केल्या. स्मिथने अॅशेस मालिकेतील सहा डावात 144, 142, 92, 211, 82 आणि 80 अशा धावा केल्या.
- तर असे 80+ धावांचा ‘षटकार’ लगावणारा स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधील केवळ दुसराच फलंदाज ठरला.स्मिथच्या आधी फक्त विंडिजचे माजी खेळाडू सर एव्हर्टन वीक्स यांनीच अशी कामगिरी केली होती. तसेच सलग जास्तीत जास्त अर्धशतकी खेळी करण्याचाही त्याने विक्रम केला.
सबीआयची ईला चॅटबोट सुविधा :
- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ईला (इंटरअॅक्टिव्ह लाइव्ह असिस्टंट) चॅटबोट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा फायदा ग्राहकांना होणार आहे. एसबीआय कार्डधारक आपल्या मोबाइल अॅपवर ईला चॅटबोट ही सेवा वापरू शकणार आहे.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आधार घेत भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) चॅटबोट हा ग्राहकांच्या समस्या सोडवणारा रोबो सोमवारपासून सेवेत दाखल केला. याची निर्मिती एआय बँकिंग मंच असलेल्या पेजो या कंपनीने तयार केला आहे. या चॅटबोटला एसबीआयने एसबीआय इंटेलिजन्ट असिस्टन्ट किंवा एसआयए (सिया) असे नाव दिले आहे.
No comments