Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?
A) जर्मनी
B) ब्रिटन
C) इस्त्राएल
D) स्लोव्हेनिया
2) ARIIA याचे पूर्ण नाव काय आहे?
A) अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
B) एव्रेज रँक्स ऑफ इंस्टीट्यूशन्स इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
C) एव्रेज रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एव्हिएशन
D) अटल रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एस्ट्रॉनॉमी
3) 13 सप्टेंबरला कोणत्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाची 166 वी जयंती साजरी करण्यात आली?
A) हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम
B) मार्टिनस बेन्जेरिन्क
C) सेलमॅन वाक्समन रोनाल्ड रॉस
D) फॅनी हेसे
4) कोणाला प्रशिक्षण देण्याकरिता आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) आणि ‘वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)’ सोबत सामंजस्य करार झाला?
A) ब्रेथवेट अँड कंपनी
B) बिगर-बँकिंग वित्त कंपनी
C) भारतीय निर्यात पत हमी महामंडळ
D) हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन
5) फिट इंडिया चळवळ आणि महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 16 महिला सदस्यांच्या चमूने कोणते पर्वतशिखर यशस्वीरित्या सर केले?
A) नंदादेवी
B) चौखंबा
C) सतोपंथ
D) पंचचुली
6) कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?
A) दिल्ली
B) राजस्थान
C) महाराष्ट्र
D) केरळ
7) भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____________ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.
A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना
B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली
C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट
उत्तरे
1. (C) इस्त्राएल
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था चंद्रमोहीमेच्या संदर्भात इस्राएल देशाच्या SpaceIL या खासगी अंतराळ केंद्रासोबत करार करणार आहे. दोन्ही देशांच्या संस्था संयुक्तपणे चंद्रमोहीमेच्या अपयशाचा तपास करून त्याची कारणे शोधण्यासाठी हा करार करणार आहे. भारताच्या चंद्रयान-2 प्रमाणेच इस्राएलच्या चंद्रमोहीमेतही अखेरच्या क्षणी अडथळे आले होते. इस्राएलचे चंद्रयान अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले होते. या यानाला अपघात झाला होता.
2. (A) अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
मनुष्यबल विकास मंत्रलयाकडून अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (ARIIA) 2020 या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
3. (A) हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम
13 सप्टेंबर रोजी जीवाणू ओळखण्यासाठी ‘ग्राम स्टेन’ पध्दती विकसित करणारे डेन्मार्कचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम यांची 166 वी जयंती सजरी केली गेली. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1853 रोजी झाला होता.
4. (D) हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन
जागतिक बँक समूहाचा भाग असलेले आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाने (IFC) देशातल्या बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य करण्यासाठी भारताच्या भांडवल व कर्जासाठी वित्तपुरवठा करणार्या ‘वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)’ या मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.
5. (C) सतोपंथ
फिट इंडिया चळवळ आणि महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 16 महिला सदस्यांच्या चमूने सतोपंथ पर्वतशिखर यशस्वीरित्या सर केले. उत्तराखंड या राज्यात असलेले ‘सतोपंथ’ पर्वतशिखर हे दुसरे सर्वोच्च शिखर आहे.
6. (D) केरळ
केरळ राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे.
7. (B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली
10 सप्टेंबर रोजी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले. ही 60 किमी लांबीची मोतिहारी-अमलेखगंज पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे.
No comments