सिकंदराबाद: ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ✔भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. यासह सिकंदराबाद ‘ग्रीन प्लॅट…
सिकंदराबाद: ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक
✔भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. यासह सिकंदराबाद ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले.
✔अनेक ऊर्जा बचतीसंबंधी चालविलेले उपक्रम तसेच प्रवाश्यांसाठी दिलेल्या आधुनिक सेवा-सुविधांचा समावेश केल्याने सिकंदराबाद स्थानकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्थानकावर CO2 संवेदकाने सुसज्जित वातानुकूलित विश्रामगृह, सौर पटले आणि LED दिव्यांचा वापर तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अश्या विविध यंत्रणा तेथे बसविण्यात आले आहेत.✔भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) बाबत: भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) हा भारतीय उद्योग परिसंघ (CII) याचा एक भाग आहे. त्याची स्थापना 2001 साली झाली. यात नवीन ग्रीन बिल्डिंग रेटिंग प्रोग्राम विकसित करणे, प्रमाणपत्र सेवा आणि हरित इमारत प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या विकसनशील पुढाकारांचा समावेश आहे.
दिव्यांग व्यक्तीसाठी सुगम्य भारत अभियान (AIC) :
✔सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाने सुगम्य भारत अभियान (AIC) याच्या भागधारकांसाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) विकसित केली आहे.
✔अभियानाच्या प्रगतीवर नजर ठेवण्यासाठी ही व्यवस्था सर्व मंत्रालये आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना एकाच व्यासपीठावर आणेल.✔अभियानाविषयी: दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे, प्रवास करणे, संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी ‘अडथळा विरहीत वातावरण’ निर्मितीसाठी अपंगत्व सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्यावतीने ‘सुगम्य भारत अभियान’ (अॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन) राबविण्यात येत आहे.
✔‘अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) कायदा-1995’ याच्या कलम 44, 45 आणि 46 मधील तरतुदीनुसार सरकारला अपंग व्यक्तीसाठी सहज वावरणे, प्रवास करणे, संवाद व संपर्क करणे शक्य होण्यासाठी सुयोग्य रॅम्प, रेलिंग, आधारासाठी कठडे किंवा आधार, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान आदी सुविधा निर्माण करणे बंधनकारक आहे. या सर्व सेवा-सुविधांची निर्मिती व अंमलबजावणी व्हावी या हेतूने ‘सुगम्य भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. अपंग व्यक्तींबरोबरच या अभियानाचा लाभ वृद्ध व जेष्ठ नागरिक, मुले आणि गरोदर महिला यांना होणार आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये जिंकले :
✔साराने गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ५३ किलो वजनी गटात रजत पदक पटकावलं होतं. या आधी विनेशला जापानच्या मायू मुकैदाने पराभूत केलं होतं. त्यामुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमधून तिला बाहेर पडावं लागलं होतं. मात्र तिला नशीबाने साथ दिली आणि रेपेचेज राऊंडमध्ये पदक मिळविता आलं. त्यामुळे २०२०मध्ये प्रवेश मिळणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.
२०२१ मधील अपंग क्रिकेटपटूंच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला :
✔नुकताच अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा ठरला. २०२१च्या अपंगाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आल्याचे संघ संचालक विनोद देशपांडे यांनी जाहीर केले.
✔गेल्या महिन्यात अपंगांच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडलाच ३६ धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत शुक्रवारी या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी आणि माजी क्रिकेटपटू करसन घावरी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
आदरातिथ्य क्षेत्राला ‘जीएसटी’त सूट :
✔केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या समितीच्या बैठकीत आदरातिथ्यासाठी असलेल्या खोल्यांच्या भाडय़ावरील वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कमी करण्यात आला. यानुसार १००१ ते ७,५०० रुपयांपर्यंत प्रति खोली-प्रति रात्र असलेल्या भाडय़ावर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के कर असेल. तर साडेसात हजार रुपयांवरील भाडय़ासाठीचा कर २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्के करण्यात आला आहे. प्रति खोली, प्रति रात्र १,००० रुपयांपर्यंत भाडे असलेल्या खोल्यांना संपूर्ण करमाफी देण्यात आली आहे.
✔बाटलीबंद कॅफीनयुक्त पेयांवरील जीएसटीत तब्बल ४० टक्के इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. या पेयांवरील जीएसटी २८ टक्क्यांनी वाढविण्यात आला असून त्यात १२ टक्के अधिभाराची भर घालण्यात आली आहे. सर्व तऱ्हेच्या पॉलिथिन पिशव्यांवर १२ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. बाटलीबंद बदाम दुधावर १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे.
No comments