Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणती व्यक्ती परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून प्रथम महिला अधिकारी आहे?
A) प्रेरणा पाठक
B) राधिका शुक्ला
C) अंजली सिंग
D) देवंशी श्रीवास्तव
2) BBPS याचे पूर्ण नाव काय आहे?
A) भारत बिल पेमेंट सिस्टम
B) भारती भीम पोर्टल सिस्टम
C) भारत बँक पेमेंट सिस्टम
D) भीम बिल पेमेंट सिस्टम
3) कोणत्या बँकेनी इंडियन बँकेसोबतच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे?
A) अलाहाबाद बँक
B) बँक ऑफ बडोदा
C) बँक ऑफ इंडिया
D) पंजाब नॅशनल बँक
4) मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स _______ ह्यांचा वार्षिक गोलकीपर ग्लोबल गोल पुरस्कार देऊन गौरव करणार आहेत.
A) बोरिस जॉनसन
B) नरेंद्र मोदी
C) जस्टिन ट्रूडो
D) स्कॉट मॉरिसन
5) ___________ पर्यंत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त (ODF) भारत बनविणे हे स्वच्छ भारत अभियानाचे उद्दीष्ट आहे.
A) 2021
B) 2020
C) 2019
उत्तरे
1. (C) अंजली सिंग
भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अंजली सिंग ह्या भारतीय हवाई दलातल्या प्रथम महिला अधिकारी बनल्या आहेत, ज्या परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून तैनात आहेत.
2. (A) भारत बिल पेमेंट सिस्टम
16 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) यांच्या देयकांसंबंधी सेवांमध्ये (प्रीपेड रिचार्ज वगळता) सर्व आवर्ती बिलांसंबंधी देयकांना (शालेय शुल्क, विमा भत्ता आणि पालिका कर) समाविष्ट करून व्याप्ती वाढविलेली आहे.
3. (A) अलाहाबाद बँक
अलाहाबाद बँकेच्या संचालक मंडळाने इंडियन बँकेसोबतच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. विलीनीकरणानंतर ती देशातली सातवी सर्वात मोठी सार्वजनिक बँक बनणार.
4. (B) नरेंद्र मोदी
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा वार्षिक गोलकीपर ग्लोबल गोल पुरस्कार देऊन गौरव करणार आहेत. 24 सप्टेंबरला एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘
5. (C) 2019
2 ऑक्टोबर 2014 रोजी आरंभ करण्यात आलेले ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून चालवले जात आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ग्रामीण भारतात ‘दुहेरी टाक्यांचे शौचालय’ तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त (ODF) भारत बनविणे हे अभियानाचे उद्दीष्ट आहे.
No comments