Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) दिल्ली जिल्हा क्रिकेट संघने (DDCA) _____________ याचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
A) वानखेडे स्टेडियम
B) आयएस बिंद्रा स्टेडियम
C) ब्रेबॉर्न स्टेडियम
D) फिरोज शाह कोटला स्टेडियम
2) छत्तीसगड राज्य सरकारने नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) किती टक्के आरक्षण दिले?
A) 5 टक्के
B) 10 टक्के
C) 15 टक्के
D) 7 टक्के
3) कोणत्या राज्य सरकारने लेमरू हत्ती वन प्रकल्प स्थापनेसंबंधी प्रस्तावाला मान्यता दिली?
A) मध्यप्रदेश
B) छत्तीसगड
C) ओडिशा
D) उत्तरप्रदेश
4) ताज्या ‘बालकल्याण निर्देशांक’मध्ये कोणत्या राज्याने पहिले स्थान प्राप्त केले आहे?
A) महाराष्ट्र
B) केरळ
C) तामिळनाडू
D) हिमाचल प्रदेश
5) 28 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी नवी दिल्लीत शालेय शिक्षणासंबंधी “________” या डिजिटल व्यासपीठाचा आरंभ केला.
A) शिक्षा
B) सरल
C) शगुन
D) विद्या
6) 2019 BWF विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंच्या पथकाने किती पदके जिंकली?
A) 3
B) 6
C) 12
D) 20
उत्तरे
1. (D) फिरोज शाह कोटला स्टेडियम
दिल्लीच्या फिरोज शहा कोटला स्टेडियमला अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे. माजी मंत्री स्व. अरुण जेटली दिल्ली जिल्हा क्रिकेट संघचे अध्यक्ष आणि BCCIचे उपाध्यक्ष होते. येत्या 12 सप्टेंबरला कोटला स्टेडियमच्या नामांतरणाच्या समारंभात हा कार्यक्रम पार पडेल. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. माजी अर्थमंत्री जेटली हे सन 1999 ते सन 2012 पर्यंत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघचे अध्यक्ष होते.
2. (B) 10 टक्के
छत्तीसगड राज्य सरकारने 27 ऑगस्ट रोजी नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) 10 टक्के आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली.
3. (B) छत्तीसगड
27 ऑगस्ट 2019 रोजी छत्तीसगड राज्य सरकारने राज्याच्या उत्तर भागात लेमरू हत्ती वन प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 1995.48 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश राखीव ठेवण्यात येणार असून त्यात कोरबा, काठघोडा, सुरगुजा आणि धरमजयगड वनविभागातल्या काही भागांचा समावेश असेल.
4. (B) केरळ
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ म्हणजेच ‘बालकल्याण निर्देशांक’ जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य, पोषण आणि शिक्षण सुविधांमधल्या अपवादात्मक कामगिरीमुळे केरळ राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे. केरळच्या पाठोपाठ तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना स्थान मिळाले आहेत. कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर यामुळे मेघालय, झारखंड आणि मध्यप्रदेश यादीत तळाशी आहेत.
5. (C) शगुन
28 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी नवी दिल्लीत शालेय शिक्षणासंबंधी “शगुन” या डिजिटल व्यासपीठाचा आरंभ केला. शालेय शिक्षणाविषयीची सर्व माहिती देण्यासाठी हे व्यासपीठ देशभरातल्या 15 लक्षाहून अधिक शाळांना एकत्र जोडते. याच्या माध्यमातून 2.3 लक्षाहून अधिक शैक्षणिक संकेतस्थळांना एकत्रित केले जाणार.
6. (C) 12
स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या 2019 BWF विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंच्या पथकाने 3 सुवर्णपदकांसह 12 पदके जिंकलीत. स्पर्धेत मानसी जोशीने तीन वेळच्या विश्व चॅम्पियन परमारला पराभूत केले आणि तिचे पहिले सुवर्ण पदक जिंकले. प्रमोद भगतने पुरुष एकेरी SL3 प्रकारात आणि पुरुषांच्या दुहेरी SL3-4 प्रकारात असे दुसरे सुवर्ण जिंकलेत.
No comments