Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 24 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे. 

1) भारतीय रिझर्व्ह बँकेनी ग्राहकांना सप्टेंबर 2019 पासून ई-जनादेश देऊन _______ पर्यंतचे आवर्ती आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी दिली.
A) रु. 2,000
B) रु. 4,000
C) रु. 6,000
D) रु. 8,000

2) कोणत्या देशाने आर्क्टिक प्रदेशात जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी उभारली?
A) साऊथ कोरिया
B) संयुक्त राज्य अमेरिका
C) जापान
D) रशिया

3) कोणत्या देशाने 23 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मानवी-आकाराचा रोबोट पाठविला?
A) जापान
B) चीन
C) रशिया
D) संयुक्त राज्य अमेरिका

4) कोणती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) कार्यक्रमात भाग घेणारी अंतराळ संस्था नाही?
A) नासा (अमेरिका)
B) रोस्कोस्मोस (रशिया)
C) जेएएक्सए (जापान)
D) आयएसए (इस्राएल)

5) भारताचे नवे गृह सचिव कोण आहेत?
A) राजीव गौबा
B) अजय कुमार भल्ला
C) सुकन्या दत्ता
D) ओ. पी. कुमार

6)रेडी टू मूव्ह इन’ प्रकल्प तयार करण्यासाठी भारतीय सैन्य आणि ________ यांच्यात सामंजस्य करार झाला.
A) टाटा रियल्टी अँड हाऊसिंग
B) रिलायन्स रियल्टी अँड हाऊसिंग
C) महिंद्रा रियल्टी अँड हाऊसिंग
D) किओ रियल्टी अँड हाऊसिंग

उत्तरे 
1. (A) रु. 2,000
भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ई-जनादेश संबंधी नोंदणीदुरूस्ती आणि निरस्तीकरण प्रक्रियेच्या दरम्यान प्रमाणीकरणाचा अतिरिक्त घटक (additional factor of authentication - AFA) यासह आवर्ती आर्थिक व्यवहारांसाठी (मर्चंट पेमेंट्स) कार्डवर ई-जनादेशाच्या प्रक्रियेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. RBI कडून दिलेले निर्देश सप्टेंबर 2019 पासून लागू होतील. RBIने ग्राहकांना सप्टेंबर 2019 पासून ई-जनादेश देऊन 2000 रुपयांपर्यंतचे आवर्ती आर्थिक व्यवहार (recurring payments) करण्यास परवानगी दिली.

2. (D) रशिया
रशियाने प्रथमच एक तरंगते अणुऊर्जा निर्मिती केंद्र एका जहाजावर उभे केले आहे आणि ही जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी आहे. या तरंगत्या अणुभट्टीला अॅकेडेमिक लोमोनोसोव्ह’ हे नाव देण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना रशियाच्या रोसेटोम’ या अणुऊर्जा कंपनीने साकारली आहे. याची उभारणी सेंट पीटर्सबर्गमध्ये केली गेली. या अणुऊर्जा संयंत्राचा आकार 144 मीटर x 30 मीटर असा असून हा 21,000 टन वजनी आहे. यामध्ये प्रत्येकी 35 मेगावॉट क्षमतेचे दोन रिएक्टर आहेतजे लक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला वीज पुरवठा करण्यास सक्षम आहेत.

3. (C) रशिया
रशियाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मानवी-आकाराचा रोबोट पाठविला आणि फेडर’ हे त्याचे नाव आहे. तो 24 ऑगस्ट 2019 रोजी स्थानकात दाखल होणार आहे. रशियाने प्रथमच एक रोबोट अंतराळात पाठविला आहे.

4. (D) आयएसए (इस्राएल)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर दूर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. अमेरिकारशियाकॅनडायुरोप आणि जापान हे देश या कार्यक्रमाचे भागीदार आहेत.

5. (B) अजय कुमार भल्ला
गृह मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजय कुमार भल्ला यांची गृहसचिवगृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. राजीव गौबाच्या जागी त्यांची नेमणूक झाली आहे.

6. (A) टाटा रियल्टी अँड हाऊसिंग
22 ऑगस्टला रेडी टू मूव्ह इन’ प्रकल्प तयार करण्यासाठी भारतीय सैन्याने टाटा रियल्टी अँड हाऊसिंग या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारानुसार भारतीय सैनिकांना तयार केल्या गेलेल्या घरांना विनाविलंब आपल्या ताब्यात घेता येणार. गुरुग्रामचेन्नईबेंगळुरूपुणे यासह 10 शहरांमध्ये ही सुविधा 11% ते 27% एवढ्या सवलतीसह उपलब्ध करून दिली जाणार आहे.

No comments