Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 9 August 2019

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रणव मुखर्जींना ह…

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित :
  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रणव मुखर्जींना हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
  • तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.
  • भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भारताने UNISA या वैश्विक करारनाम्यावर स्वाक्षरी केली :
  • दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी सिंगापूर कन्व्हेंशन ऑन मिडीयेशन” या नावाने ओळखल्या जाणार्‍या मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद’ (UNISA) यावर भारतासह संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या 46 सदस्यांनी सिंगापूरमध्ये स्वाक्षर्‍या केल्या. यावर अमेरीका आणि चीन या देशांनीही स्वाक्षर्‍या केल्या.
  • 20 डिसेंबर 2018 रोजी मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UN Convention on International Settlement Agreements -UNISA) स्वीकारले गेले. हा वैश्विक करारनामा अंमलात आणण्यासाठी आता केवळ तीन सदस्य देशांच्या स्वाक्षर्‍या हव्या आहेत.
  • या कराराच्या अंमलबजावणीमुळे व्यवसाय करणे अधिकाधीक सुलभ होण्यास मदत होणार. कॉर्पोरेट क्षेत्रातले तंटे सोडविण्यासाठी मध्यस्थींची गरज ओळखली गेली आहे. 2005 साली चेन्नईत भारताचे पहिले मध्यस्थी केंद्र स्थापन केले गेले.

अंतराळात इस्रोचा विक्रम साराभाई पत्रकारिता पुरस्कार :
  • भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) पत्रकारिता क्षेत्रात दोन प्रकारची पुरस्कारांची स्थापना केली- अवकाश विज्ञानतंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विक्रम साराभाई पत्रकारिता पुरस्कार. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली आहे.
  • याचा उद्देश अवकाश विज्ञानअनुप्रयोग आणि संशोधन क्षेत्रात सक्रियपणे योगदान देणार्‍या पत्रकारांना ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे असा आहे. पत्रकारितेचा चांगला अनुभव असणाऱ्या सर्व भारतीयांसाठी याची नामांकने खुली आहेत. या पुरस्कारासाठी 2019-2020 दरम्यान प्रकाशित झालेल्या लेखांवर विचार केला जाईल.

विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्रने होणार सन्मान :
  • भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना 27 फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ 16 फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा विरचक्र’ पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
  • तर यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 फायटर विमानावर वर आर- 73 मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग 21 बायसन विमानाला धडकले.

रेस: राजस्थानचे नवीन उच्च शिक्षण मॉडेल :
  • राजस्थान राज्य सरकारने जिल्हा स्तरावर शासकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचे व जंगम मालमत्तेचे वितरण करण्यासाठी उत्कृष्टतासह महाविद्यालयांसाठी संसाधन सहाय्य किंवा RACE, असे एक नवीन उच्च शिक्षण मॉडेल सुरू केले आहे जेणेकरुन संसाधनांची उपलब्धता तर्कसंगत होईल.
  • RACE मॉडेल सुविधा वाटून घेण्यासाठी एक मंच तयार करेल ज्यामुळे पायाभूत सुविधा नसणाऱ्या महाविद्यालयांना फायदा होईल. शासकीय महाविद्यालयांतील शिक्षकांची मंजूर पदे 6,500 असूनही सध्या जवळपास हजार शिक्षकांची पदे कमी पडत आहेत.
  • म्हणून अतिरिक्त पदे तयार होईपर्यंत आणि नवीन नेमणुका होईपर्यंतरेसकडून संसाधनांसाठी मार्ग दाखविण्यात मदत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री करणे अपेक्षित आहे.

No comments