Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
1) मास्टरकार्डने कार्ड पेमेंटच्या प्रक्रियेत कोणते वैशिष्ट्य सादर केले आहे जे ग्राहकांना ऑनलाइन खरेदी करताना अखंडित व्यवहार करण्यास अनुमती देणार?
A) मास्टरकार्ड एक्सप्रेस
B) आयडेंटिटी चेक एक्सप्रेस
C) आयडेंटिटी चेक
D) युवर कार्ड एक्सप्रेस
2) सरकारी मालकीच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी कोणी स्वीकारली?
A) आर. के. चौहान
B) के. श्रीकांत
C) घनश्याम प्रसाद
D) मनोजकुमार मित्तल
3) 5 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त लेखकाचे/लेखिकेचे नाव काय आहे?
A) गॅब्रिएल गार्सिया मर्केझ
B) एलिस मुनरो
C) टोनी मॉरिसन
D) अँड्र्यू ब्राउन
4) भारताच्या NCAER या आर्थिक वैचारिक संस्थेच्या मते, 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वृद्धीदर _____ राहणार.
A) 6.2 टक्के
B) 6.8 टक्के
C) 7.0 टक्के
D) 7.2 टक्के
5) पॅलेस्टिनी शरणार्थींसाठीच्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी (UNRWA) यामध्ये भारताने ________ डॉलर एवढ्या रकमेचे योगदान दिले.
A) 2 दशलक्ष डॉलर
B) 3 दशलक्ष डॉलर
C) 8 दशलक्ष डॉलर
D) 5 दशलक्ष डॉलर
उत्तरे
1. (B) आयडेंटिटी चेक एक्सप्रेस
वैश्विक पेमेंट सोल्यूशन्स असलेल्या मास्टरकार्ड या प्रमुख कंपनीने कार्ड पेमेंटच्या प्रक्रियेत “आयडेंटिटी चेक एक्सप्रेस” या नावाचे एक वैशिष्ट्य सादर केले आहे, जे ग्राहकांना ऑनलाइन खरेदी करताना अखंडित व्यवहार करण्यास अनुमती देईल. “आयडेंटिटी चेक एक्सप्रेस” हे पुढील पिढीचे मोबाइल फर्स्ट ऑथेंटीकेशन सोल्यूशन आहे, जे अनावश्यक अडथळा दूर करेल आणि देयकाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थर्ड-पार्टी संकेतस्थळाकडे पुनःनिर्देशित केले जाण्याच्या प्रक्रियेला वगळून ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षितता वाढवेल.
2. (B) के. श्रीकांत
कांदीकुप्पा श्रीकांत यांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
3. (C) टोनी मॉरिसन
नोबेल पुरस्कार विजेत्या साहित्यकार अमेरिकेच्या टोनी मॉरिसन यांचा 5 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला. त्यांची “बीलव्हड”, "सॉन्ग ऑफ सॉलोमन" ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1988 साली “बीलव्हड”साठी पुलित्झर पुरस्कारही जिंकला होता.
4. (A) 6.2 टक्के
नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनोमिक रिसर्च (NCAER) या आर्थिक वैचारिक संस्थेच्या मते, 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वृद्धीदर 6.2% राहणार.
5. (D) 5 दशलक्ष डॉलर
पॅलेस्टिनी शरणार्थींसाठीच्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीला (UNRWA) मदत म्हणून भारताने 5 दशलक्ष डॉलर एवढी रक्कम देऊ केली. संयुक्त राष्ट्रसंघ मदत व कार्य संघटना (UNRWA) याची स्थापना डिसेंबर 1949 मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रसंघाची ही मदत व मानव विकास संघटना 1948 सालच्या पॅलेस्टाईन युद्धादरम्यान तसेच 1967 सालच्या सहा दिवसांच्या युद्धादरम्यान आपले घर सोडून पळ काढावा लागणार्या पाच दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत पॅलेस्टीनी निर्वासित आणि त्यांचे वंशज यांना मदत पुरविते.
No comments