पी. व्ही. सिंधू: BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय बासेल (स्वीत्झर्लंड) येथे भारताच्या पी. व्ही. सिंधू ह्या बॅडमिंटनपटूने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे विजेतेप…
पी. व्ही. सिंधू: BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय
- बासेल (स्वीत्झर्लंड) येथे भारताच्या पी. व्ही. सिंधू ह्या बॅडमिंटनपटूने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह, 24 वर्षीय पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय ठरली आहे.
- 25 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात सिंधूने जापानच्या नोझोमी ओकुहाराचा एकतर्फी धुव्वा उडवला. तसेच या स्पर्धेत तिने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदकासह एकूण पाच पदकांची कमाई करताना चीनची बॅडमिंटनपटू झांग नींग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
स्पेनमध्ये जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकली :
- स्पेन देशाच्या माद्रिद शहरात खेळविण्यात आलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये ज्युनियर (अंडर-21) मिश्र संघ गटातल्या मार्कू रागिनी आणि सुखबीर सिंग यांच्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.
- तसेच भारताची कोमलिका बारी ही स्पर्धेतली रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती बनली. तिने अंतिम फेरीत जापानच्या सोनोदा वाका हिला पराभूत करून भारतासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकले. 2009 साली विश्वविजेती बनणार्या दिपीका कुमारी नंतर हे जेतेपद जिंकणारी 17 वर्षाची कोमलिका भारताची दुसरी रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती (18 वर्षाखालील) आहे.
- या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण व एक कांस्यपदक असे एकूण तीन पदके मिळवून त्याच्या मोहिमेची सांगता केली. कंपाऊंड ज्युनियर पुरुष संघात भारताने कांस्यपदक जिंकले.
"कलवी तोलाईकाच्ची" TV: तामिळनाडू सरकारची विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी
- राज्यातल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने, 26 ऑगस्ट 2019 रोजी तामिळनाडू राज्य सरकारने एक विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी (टीव्ही चॅनेल) सुरू केले. "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) असे या वाहिनीचे नाव आहे.
- चेन्नई येथे राज्याचे मुख्यमंत्री के. पालानीस्वामी यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने या वाहिनीचे उद्घाटन केले गेले. या वाहिनीच्या माध्यमातून नोकरी आणि संबंधित मुद्द्यांच्या व्यतिरिक्त शालेय मुलांना उद्देशून विविध शैक्षणिक मालिका प्रस्तुत केल्या जातील. त्यामुळे विद्यार्थी आता घरून शिकू शकण्यास सक्षम होतील.
नरेंद्र मोदी यांना बहारिनचा पुरस्कार :
- भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
- बहारिनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले मोदी यांनी शनिवारी रात्री बहारिनच्या राजांची भेट घेतली असता त्यांना हा गौरवास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने मला माझा मोठा सन्मान झाल्याचे वाटत आहे.
- बहारिनच्या राजांच्या माझ्याबद्दल व माझ्या देशाबद्दल असलेल्या मैत्रीभावनेमुळे माझा तितकाच सन्मान झाला आहे. १३० कोटी भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो. हा संपूर्ण भारताचा सन्मान आहे. बहरैन साम्राज्य व भारत यांच्यातील घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंधांना मिळालेली ही मान्यता आहे. हे संबंध हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, असे मोदी म्हणाले.
फ्रान्समध्ये जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित :
- फ्रान्स देशाच्या बिआरिट्झ या शहरात 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2019 या काळात 45 वी जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या या शिखर परिषदेत उपस्थित राहणार आहेत. तेथे ते पर्यावरण, हवामान आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या जागतिक विषयांवर चर्चा करतील आणि जागतिक नेत्यांची भेट घेतील.
जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) बद्दल
- 1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव ‘जी-7’ समूह हे पडले.
- सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 2014 साली याची पुनर्रचना झाली असून ते स्थापना वर्ष आहे.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. या गटातल्या प्रगत अर्थव्यवस्थांची एकत्रित संपत्ती निव्वळ जागतिक संपत्तीच्या 58% आहे.
No comments