Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) भारताने आपली रुपे कार्ड ही इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली सादर केली त्या मध्य-पूर्व प्रदेशातल्या पहिल्या देशाचे नाव ओळखा.
A) संयुक्त अरब अमिरात
B) सौदी अरब
C) बहरीन
D) कुवैत
2) अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली आहेत?
A) 159
B) 1,159
C) 2,159
D) 3,159
3) कोणत्या देशाने 25 ऑगस्ट 2019 रोजी नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” याची चाचणी घेतली?
A) उत्तर कोरिया
B) दक्षिण कोरिया
C) संयुक्त राज्ये अमेरिका
D) रशिया
4) 24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _____ येथे 200 वर्ष जुन्या श्री कृष्णा मंदिराच्या पुनर्विकासासाठी 4.2 दशलक्ष डॉलर इतका खर्च असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
A) अबू धाबी, संयुक्त अरब अमिरात
B) मक्का, सौदी अरब
C) मनामा, बहरीन
D) जेद्दाह, सौदी अरब
5) कोणत्या ठिकाणी जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित केली गेली?
A) मनामा, बहरीन
B) बिआरिट्झ, फ्रान्स
C) अबू धाबी, सौदी अरब
D) वरीलपैकी कुठेही नाही
उत्तरे
1. (A) संयुक्त अरब अमिरात
24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबूधाबीमध्ये 'रुपे कार्ड' सादर करण्यात आले. त्यामुळे 'रुपे कार्ड' सादर करणारा संयुक्त अरब अमिरात (यूएई) हा पश्चिम आशियातला आणि मध्य-पूर्व प्रदेशातल्या पहिला देश ठरला आहे. 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये पेमेंट प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. रुपे कार्ड सादर करणारा यूएई हा पश्चिम आशियातील पहिला देश ठरल्याने पर्यटन आणि व्यापारासाठी त्याची मोठी मदत होणार. तत्पूर्वी भुटान आणि सिंगापूरमध्येही 'रुपे' सादर करण्यात आले आहे.
2. (B) 1,159
शहरी भागात लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सांडपाण्यासाठी नाले, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा मिळण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालयाने 2015 साली अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) सुरू केली. या मोहिमेच्या अंतर्गत देशभरात ऑगस्ट 2019 महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण 1159 उद्याने विकसित करण्यात आली आहेत.
3. (A) उत्तर कोरिया
उत्तर कोरियाने 25 ऑगस्ट 2019 रोजी त्याच्या नवीन “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर”ची चाचणी घेतली. उत्तर कोरिया हा पूर्व आशियातला एक देश आहे जो कोरिया द्वीपकल्पातला उत्तर भाग आहे.
4. (C) मनामा, बहरीन
24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीन देशाच्या मनामा या शहरात 200 वर्ष जुन्या श्री कृष्णा मंदिराच्या पुनर्विकासासाठी 4.2 दशलक्ष डॉलर इतका खर्च असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. 24 ऑगस्ट 2019 रोजी बहरीनला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. बहरीन हा फारसी आखाती प्रदेशातला एक बेटराष्ट्र आहे.
5. (B) बिआरिट्झ, फ्रान्स
फ्रान्स देशाच्या बिआरिट्झ या शहरात 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2019 या काळात 45 वी जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या या शिखर परिषदेत उपस्थित राहणार आहेत. तेथे ते पर्यावरण, हवामान आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या जागतिक विषयांवर चर्चा करतील आणि जागतिक नेत्यांची भेट घेतील.
No comments