Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
A) 363
B) 102
C) 278
D) 400
2) कोणते राज्य द्वितीय ‘संयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक’ (CWMI 2.0) यामध्ये प्रथम स्थानी आहे?
A) आंध्रप्रदेश
B) मध्यप्रदेश
C) गुजरात
D) कर्नाटक
3) भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) याची पहिली-वहिली अत्याधुनिक ‘राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा-दिल्ली राजधानी क्षेत्र’ कुठे उघडण्यात आली?
A) गाझियाबाद
B) गुरुग्राम
C) नोएडा
D) फरीदाबाद
4) 24 ऑगस्ट 2019 रोजी माजी अर्थमंत्रीचे निधन झाले. त्या व्यक्तीचे नाव काय होते?
A) अरुण जेटली
B) पियुष गोयल
C) पी. चिदंबरम
D) मनमोहन सिंग
5) 23 ऑगस्ट 2019 रोजी 7 व्या आवृत्तीच्या आर्थिक जनगणनेच्या प्रथम टप्प्याच्या आरंभ कुठे करण्यात आला?
A) आसाम
B) हिमाचल प्रदेश
C) मणीपूर
D) ओडिशा
6) कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला?
A) सौदी अरब
B) कुवैत
C) ओमान
D) संयुक्त अरब अमिरात
उत्तरे
1. (A) 363
2018-19 या वर्षासाठी ‘पोषण’ अभियान पुरस्कार वितरण समारंभात विविध गटांमध्ये एकूण 22 कोटी रुपयांचे रोख बक्षीसे असलेले 363 पुरस्कार वितरित करण्यात आले. सन महिला व बाल विकास मंत्रालयाने 2018 साली POSHAN (पार्टनर्शिप्स अँड ऑपर्चुनिटीज टू स्ट्रेंदन अँड हार्मोनाईज अॅक्शन्स फॉर न्यूट्रिशन इन इंडिया) अभियान सुरू केले.
2. (C) गुजरात
NITI आयोगाने जलसंवर्धनाशी संबंधित राज्यांनी केलेल्या उपाययोजना आणि त्यांची एकूणच स्थिती याबाबतचा द्वितीय ‘संयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक’ (CWMI 2.0) प्रसिद्ध केला. त्यामध्ये 2017-18 या संदर्भ वर्षात गुजरात पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो आहे. ईशान्य आणि हिमालयीन राज्यांच्या गटात हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर आले असून त्यानंतर उत्तराखंड, त्रिपुरा आणि आसाम यांचा क्रमांक लागतो. केंद्रशासित प्रदेशांच्या गटात पुडुचेरी अव्वल क्रमांकावर आहे.
3. (A) गाझियाबाद
23 ऑगस्ट 2019 रोजी, गाझियाबाद येथे भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) याची पहिली-वहिली अत्याधुनिक ‘राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा-दिल्ली राजधानी क्षेत्र’ उघडण्यात आली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अन्न क्षेत्रातले हे पहिलेच उपक्रम आहे.
4. (A) अरुण जेटली
भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांनी 26 मे 2014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. शिवाय 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.
5. (C) मणीपूर
23 ऑगस्ट 2019 रोजी, मणीपूर राज्याच्या इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, थौबल, काकींग आणि जिरीबम या जिल्ह्यांमध्ये 7 व्या आवृत्तीच्या आर्थिक जनगणनेच्या प्रथम टप्प्याच्या आरंभ करण्यात आला. 9 सप्टेंबर रोजी सुरू होणार्या द्वितीय टप्प्यात 10 डोंगराळ जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे.
6. (D) संयुक्त अरब अमिरात
24 ऑगस्ट 2019 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशाचा “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला. देशांमधील द्वैपक्षीय संबंधांना चालना मिळालेल्या त्यांच्या विशिष्ट नेतृत्त्वाच्या सन्मानार्थ एप्रिल 2019 मध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. देशाचे जनक शेख जाईद बिन सुलतान अल नह्यान यांच्या नावावर हा पुरस्कार ठेवण्यात आला आहे.
No comments