रवी शास्त्री: नोव्हेंबर 2021 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक 17 ऑगस्ट रोजी कपिल देव (अध्यक्ष), अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक…
रवी शास्त्री: नोव्हेंबर 2021 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक
- 17 ऑगस्ट रोजी कपिल देव (अध्यक्ष), अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड केली. आता रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2021 पर्यंत असणार आहे.
- रवी शास्त्री यांची तिसऱ्यांदा प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. आता रवी शास्त्रींसमोर चार प्रमुख आव्हाने आहेत आणि ते आहेत – 2020 साली टी-20 विश्वचषक; 2021 साली टी-20 विश्वचषक, 2021 विश्व कसोटी अजिंक्यपद आणि 2021 विश्व एकदिवसीय अजिंक्यपद.
- रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 21 कसोटी सामने खेळले. त्यातल्या 13 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यासोबतच एकदिवसीय सामन्यात 60 पैकी 43 सामन्यांमध्ये विजय मिळवला.
लेह येथे “आदी महोत्सव”चा शुभारंभ :
- दि. 17 ऑगस्ट 2019 रोजी लदाखच्या लेह येथे नऊ दिवस चालणार्या "आदी महोत्सव" या राष्ट्रीय आदिवासी उत्सवाचा शुभारंभ झाला. केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
- "ए सेलीब्रेशन ऑफ द स्पिरिट ऑफ ट्रायबल क्राफ्ट, कल्चर अँड कॉमर्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- हा महोत्सव आदिवासी कल्याण मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाद्वारा (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेलेला कार्यक्रम आहे. दि. 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत हा महोत्सव चालणार.
- लदाख प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर भारत सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा पहिला मोठा कार्यक्रम आहे. लदाखमध्ये जवळपास 97 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. देशभरातून 20 हून अधिक राज्यातून सुमारे 160 आदिवासी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा – हिमाचे सुवर्णयश! :
- चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या अॅथलेटिकी मिटिंक रेयटर आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील ३०० मीटर शर्यतीत महिलांमध्ये हिमा दासने आणि पुरुषांमध्ये मोहम्मद अनासने सुवर्णपदकाची कमाई केली.
- २ जुलैपासून हिमाने युरोपीयन शर्यतींमध्ये मिळवलेले हे सहावे सुवर्णपदक ठरले. यापैकी पाचवे सुवर्ण तिने चेक प्रजासत्ताकमधील नोव्हे मेस्टो येथे झालेल्या ४०० मीटर शर्यतीत जिंकले होते. ‘‘चेक प्रजासत्ताक येथील अॅथलेटिकी मिटिंक रेयटर स्पध्रेत ३०० मीटर शर्यतीत अग्रस्थान मिळवले,’’ असे ‘ट्वीट’ हिमाने शनिवारी स्पर्धा जिंकल्यानंतर केले.
- अनासने ३२.४१ सेकंद वेळ नोंदवत पुरुषांचे सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘अॅथलेटिकी मिटिंक रेयटर २०१९ स्पध्रेच्या ३०० मीटर शर्यतीचे ३२.४१ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक मिळाल्याचा अत्यंत आनंद होत आहे.’’
- दोहा येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पध्रेच्या ४०० मीटर प्रकारासाठी राष्ट्रीय विक्रमवीर अनास आधीच पात्र झाला आहे. परंतु हिमाला अद्याप पात्र होता आलेले नाही.
- जागतिक स्पध्रेसाठी पात्र होण्याची अखेरची संधी नवी दिल्लीत भारतीय अॅथलेटिक्स महासंघातर्फे ५ सप्टेंबरला नवी दिल्लीत इंडियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले असून, जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्र होण्याकरिता ही अखेरची संधी असेल. पुरुषांसाठी ४०० मीटर अथडळा, पोल व्हॉल्ट, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, भाला फेक आणि ४ बाय ४०० मीटर रीले प्रकारांच्या स्पर्धाचा समावेश आहे, तर महिलांसाठी १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि लांब उडी अशा स्पर्धा होतील.
7 सप्टेंबरला ‘चांद्रयान’चंद्रावर उतरणार, मोहीम योग्य दिशेने – इस्रो
- ‘चांद्रयान-2’ ही चंद्रावर स्वारी करणारी हिंदुस्थानची मोहीम योग्य दिशेने चालली असून ठरल्याप्रमाणे हे यान चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूला येत्या 7 सप्टेंबरला उतरणार आहे, अशी माहिती हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) नुकतीच ट्विटरवरील आपल्या अधिकृत हॅण्डलवर दिली.
- या मोहिमेत इस्रो चंद्राच्या आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या बाजूचे संशोधन करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणारे हिंदुस्थानचे हे पहिलेच पाऊल असणार आहे. या यानामध्ये ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हर अशी तीन उपकरणे आहेत. आपल्या बळावर चंद्रावर स्वारी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे.
- यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली आहे. बुधवारीच हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन ते चार या वेळेत ‘ट्रान्स लुनर इन्सर्शन’ ही प्रक्रिया यानाने पार पाडली आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला ‘चांद्रयान-2’ हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार असून त्यानंतर 7 सप्टेंबरला ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरेल, असेही इस्रोने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
आजपासून रंगणार विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची नजर सुवर्णपदकावर :
- भारतासाठी दोन रौप्य पदक मिळणाऱ्या सिंधूचे लक्ष्य सोमवारपासून सुरु होणा-या बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याकडे केंद्रीत झाले आहे. सिंधूने मागील काही वर्षांत या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने दोन रौप्य व दोन कांस्यपदक मिळवली आहेत. मात्र आतापर्यंत तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.
- सिंधूला या स्पर्धेत दोन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये ११० मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या नाओमी ओकुहाराकडून, तर २०१८ मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
- सिंधू गत महिन्यात इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेती ठरली होती. सध्या ती आपल्या बचाव व तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. सिंधूला पहिंल्या फेरीत बाय मिळाला असून चीनी तैपईची पाई यू पो व बुल्गारियाची लिंडा जेचिरी यांच्यातील विजेतीविरुद्ध ती खेळेल.
No comments