Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे
1) "आदी महोत्सव 2019" हा राष्ट्रीय आदिवासी उत्सव कुठे आयोजित केला गेला?
A) मुंबई, महाराष्ट्र
B) लेह, लदाख
C) भुवनेश्वर, ओडिशा
D) रांची, झारखंड
2) वार्षिक ‘कोंकण 2019’ नौ सराव भारत आणि ____________ या देशांच्या सहभागाने आयोजित करण्यात आला.
A) ब्रिटन
B) फ्रान्स
C) रशिया
D) जापान
3) _________ हा दक्षिण इंग्लंड व उत्तर फ्रान्स ह्या भागांना वेगळा करणारा एक जलभाग आहे आणि उत्तर समुद्राचा दक्षिण भाग अटलांटिक महासागरासोबत जोडतो.
A) डोव्हरची सामुद्रधुनी
B) उत्तर खाडी
C) इंग्लिश खाडी
D) आयरिश खाडी
4) चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (CASC) ह्याच्या एका केंद्राने व्यवसायिक वापरासाठी विकसित केलेल्या प्रथम अग्निबाणाचे नाव काय आहे?
A) ड्रॅगन-1
B) ड्रॅगन आरओ-1
C) कोबोल-1
D) स्मार्ट ड्रॅगन-1
5) भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असणार?
A) कपिल देव
B) माईक हेसन
C) रवी शास्त्री
D) टॉम मूडी
6) 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2019' चा कार्यक्रमाचा यजमान देश कोण होता?
A) ब्रिटन
B) चीन
C) भारत
D) फ्रान्स
उत्तरे
1. (B) लेह, लदाख
दि. 17 ऑगस्ट 2019 रोजी लदाखच्या लेह येथे नऊ दिवस चालणार्या "आदी महोत्सव" या राष्ट्रीय आदिवासी उत्सवाचा शुभारंभ झाला. केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. "ए सेलीब्रेशन ऑफ द स्पिरिट ऑफ ट्रायबल क्राफ्ट, कल्चर अँड कॉमर्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव आदिवासी कल्याण मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाद्वारा (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेलेला कार्यक्रम आहे. दि. 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत हा महोत्सव चालणार.
2. (A) ब्रिटन
भारतीय नौदल आणि ब्रिटनची रॉयल नेव्ही यांचा वार्षिक ‘कोकण 2019’ सराव इंग्लिश खाडीत आयोजित करण्यात आला. 14 ऑगस्ट 2019 रोजी या सरावाला सुरुवात झाली. या सरावात भारतीय नौदलाची INS तर्कश ही युद्धनौका आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्हीची HMS डिस्ट्रॉयर ही नौका सामील झाली.
3. (C) इंग्लिश खाडी
इंग्लिश खाडी हा इंग्लंड व फ्रान्स ह्या देशांना वेगळा करणारा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. इंग्लिश खाडी उत्तर समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते. इंग्लिश खाडीची लांबी 560 किमी तर रुंदी 240 किमी ते 34 किमी एवढी आहे. ह्या खाडीचा सर्वात अरुंद भाग (34 किमी) डोव्हरची सामुद्रधुनी ह्या नावाने ओळखला जातो.
4. (D) स्मार्ट ड्रॅगन-1
17 ऑगस्ट 2019 रोजी, चीनी सरकारच्या चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (CASC) ह्या संस्थेनी व्यवसायिक वापरासाठी तयार केलेल्या ‘स्मार्ट ड्रॅगन-1’ या त्याच्या प्रथम अग्निबाणाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. 23 टन वजनाच्या या अग्निबाणाने गान्सू प्रांताच्या जिन्कुवान येथून तीन उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात सोडले.
5. (C) रवी शास्त्री
17 ऑगस्ट रोजी कपिल देव (अध्यक्ष), अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड केली. आता रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2021 पर्यंत असणार आहे.
6. (B) चीन
8-15 ऑगस्ट 2019 या काळात चीनमधील चेंगडू येथे खेळविण्यात आलेल्या 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2019' या स्पर्धेत तेलंगणा राज्यातल्या सायराबाद पोलीस आयुक्तालयात कामावर असलेल्या अतिरिक्त पोलीस निरीक्षक एन. बोस किरण ह्यांनी दोन कांस्यपदके जिंकली. त्यांनी 35+ वर्षे वयोगटात टेनिस खेळात ही पदके जिंकली. त्यांनी एकेरीत व दुहेरीत दोन्ही गटात विजय मिळविला.
No comments