Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 20 August 2019

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.4…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
  • 4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे. प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे. 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.
  • मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे. बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.
  • भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे. थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपयाभुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.
 
झेक प्रजासत्ताकमध्ये हिमा दासमोहम्मद अनास यांनी सुवर्णपदके जिंकली :
  • झेक प्रजासत्ताक या देशात सुरु असलेल्या मिटींक रीटर अॅथलेटिक्स स्पर्धेत 300 मीटर शर्यतीत भारताचे धावपटू हिमा दास व मोहम्मद अनास यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे.
  • 2 जुलैपासून युरोपमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धांमध्ये हिमा दासचे हे सहावे सुवर्णपदक ठरले. 17 ऑगस्टला झालेल्या 300 मीटरच्या शर्यतीत हिमाने 33.29 सेकंद अशी वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. या प्रकारात रशियाला रौप्य तर पोलंडला कांस्यपदक मिळाले.
  • या स्पर्धेत भारताचा युवा धावपटू मोहम्मद अनासने 300 मीटरच्या शर्यतीत 32.41 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. युरोपमधील स्पर्धांमधील अनासचे हे चौथे सुवर्ण आहे.

'चांद्रयान 2आज चंद्राच्या कक्षेत पोहचणार :
  • 'चांद्रयान-2' आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करणार असूनचांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहचणार आहे.
  • चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहचणार आहेअशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे.
  • चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल.

साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस२५ महिला मल्ल निलंबित  :
  • आॅलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक हिला विनापरवानी राष्टÑीय शिबिर सोडल्यावरून भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. याच आरोपांवरून शिबिरात सहभागी असलेल्या २५ महिला मल्लांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
  • लखनौ येथील साई केंद्रात सहभागी ४५ महिला मल्लांपैकी २५ जणींनी कुठलेही कारण न देता शिबिराकडे पाठ फिरविली होती. या २५ मल्लांमध्ये साक्षी मलिक (६२ किलो)सीमा बिस्ला (५० किलो)आणि किरण (७६ किलो)यांनी नुकतीच विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठली आहे.
  • या तिघींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून बुधवारपर्यंत उत्तर मागितले आहे. याशिवाय
  • अन्य सर्व मल्लांना पुढील आदेशापर्यंत राष्टÑीय शिबिरातून निलंबित करण्यात आले. याशिवाय सोमवारी झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या बिगर आॅलिम्पिक श्रेणी चाचणीत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला.

No comments