Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 18 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) कोणता देश ‘MILAN 2020’ हा बहुपक्षीय नौदलांचा सराव आयोजित करणारा यजमान देश असेल?
A) बांग्लादेश
B) श्रीलंका
C) थायलँड
D) भारत

2) 16 व्या शतकातले संत चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनाला समर्पित असलेले जगातले पहिले संग्रहालय कुठे उघडण्यात आले?
A) पुणे
B) कोलकाता
C) बेंगळुरू
D) मंगलोर

3) 2019 सालाची BRICS गटाच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?
A) साओ पौलोब्राझील
B) नवी दिल्लीभारत
C) शांघायचीन
D) मॉस्कोरशिया

4) ऑस्ट्रेलिया अँड न्युझीलँड बँकिंग ग्रुपने (ANZ) 2019-20 या आर्थिक वर्षासाठी पूर्वीचा 6.5 टक्के एवढा भारताचा आर्थिक वृद्धीदराचा अंदाज कमी करीत तो _______ एवढा केला आहे.
A) 6.0 टक्के
B) 6.1 टक्के
C) 6.2 टक्के
D) 6.4 टक्के

5) कोणती भारतीय हवाईसेवा कंपनी ध्रुवीय क्षेत्रावरुन व्यवसायिक उड्डाणे संचालित करणारी पहिली भारतीय हवाईसेवा कंपनी ठरली?
A) जेट एयरवेज
B) स्पाइसजेट
C) एयर इंडिया
D) इंडिगो

उत्तरे 
1. (D) भारत
भारतीय नौदलाकडे मार्च 2020 या महिन्यात होणार्‍या ‘MILAN’ या बहुपक्षीय नौदल सरावाचे यजमानपद देण्यात आले आहे. हा सराव विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे होणार आहे. 1995 सालापासून हा सराव अंडमान व निकोबार कमांड (ANC) येथे आयोजित होत आहे. मात्र 2020 साली पहिल्यांदाच हा सराव इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्य भूप्रदेशावर घेतला जाणार आहे.

2. (B) कोलकाता
कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे 16 व्या शतकातले संत चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनाला समर्पित असलेले जगातले पहिले संग्रहालय उघडण्यात आले. 13 ऑगस्ट 2019 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संग्रहालयाचे उद्घाटन केले. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम (NCSM) याने या संग्रहालयाची रचना केली आहे. हे संग्रहालय गौडिया मिशन’ या संस्थेचा प्रकल्प आहे. गौडिया मिशन ही 1935 साली स्थापना करण्यात आलेली एक आध्यात्मिक व परोपकारी संस्था आहे.

3. (A) साओ पौलोब्राझील
17 ऑगस्ट 2019 रोजी साओ पौलो (ब्राझील) येथे BRICS गटाच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक पार पडली. त्याच्याच पार्श्वभूमीवर ‘BRICS जॉइंट वर्किंग ग्रुप ऑन एनवायरनमेंट’ याची दोन दिवस चालणारी बैठक देखील घेतली गेली. बैठकीत केंद्रीय पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वात भारतीय शिष्टमंडळ उपस्थित होते.

4. (C) 6.2 टक्के
ऑगस्ट 2019 महिन्यात ऑस्ट्रेलिया अँड न्युझीलँड बँकिंग ग्रुपने (ANZ) 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (GDP) वृद्धीदर 6.2% एवढा अंदाजित केला. यापूर्वी हाच अंदाज 6.5 टक्के एवढा बांधण्यात आला होता.

5. (C) एयर इंडिया
एयर इंडिया या भारताच्या सरकारी हवाईसेवा कंपनीने त्याचे बोइंग 777’ विमान उत्तर ध्रुवावरून उडवले. या यशानंतर एयर इंडिया ही ध्रुवीय क्षेत्रावरुन व्यवसायिक उड्डाणे संचालित करणारी पहिली भारतीय हवाईसेवा कंपनी ठरली. दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को’ दरम्यान एयर इंडियाच्या विमानाने प्रवास केला. AI-173 विमानाने सुमारे 243 प्रवाश्यांसह पहाटे वाजता उड्डाण केले. त्याच्या प्रवासादरम्यान पाकिस्तानअफगाणिस्तानकझाकस्तानरशियाला मागे टाकत दुपारी 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत विमानाने उत्तर ध्रुवाला ओलांडून पृथ्वीच्या दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी निघाले. नव्या मार्गाने पूर्वीच्या मार्गाच्या तुलनेत जवळपास दीड तासाचा कमी प्रवास कालावधी लागला.

No comments