Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 13 August 2019

राफेल नदालने पाचव्यांदा रॉजर्स चषक टेनिस स्पर्धा जिंकली : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल ह्याने ‘रॉजर्स चषक 2019’ ही स्पर्धा जिंकली.स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला. या व…

राफेल नदालने पाचव्यांदा रॉजर्स चषक टेनिस स्पर्धा जिंकली :
  • स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल ह्याने रॉजर्स चषक 2019’ ही स्पर्धा जिंकली.
  • स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला. या विजयासह त्याने आपले पाचवे रॉजर्स चषक जिंकले.

BCCI राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत आली :
  • केंद्र सरकारच्या वाढत्या दडपणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय क्रिडा संघटनेचा दर्जा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ते आता राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येणार.  केंद्रीय क्रिडा सचिव राधेश्‍याम झुलानिया, NADAचे महासंचालक नवीन अग्रवाल, BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • जरी मंडळास आर्थिक स्वायत्तता असली तरी अन्य क्रिडा संघटनांप्रमाणेच BCCI ही राष्ट्रीय क्रिडा महासंघाच्या कार्यकक्षेत येणार आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत त्यांची माहिती घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. विविध खेळाडूंच्या ठावठिकाणांबाबत वेळोवेळी BCCIला NADA संस्थेकडे माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती न देणाऱ्या खेळाडूंवर NADA संस्थेकडून कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे.
  • जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने (WADA) ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या उद्देशानेआत्तापर्यंत स्वीडन येथे असलेली आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी व्यवस्थापन (International Dope Testing Management -IDTM) ही संस्था क्रिकेटपटूंचे नमुने गोळा करून ते राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेत (NDTL) जमा करीत आहे. IDTM ही BCCI ने नमुने घेण्यासाठी नेमलेली बाह्य-संस्था होती.

शालेय विद्यार्थ्यांसाठी इस्रोची प्रश्नमंजुषा :
  • इस्रोच्या बंगळुरु केंद्रात बसून चांद्रयान २’ चंद्रावर उतरताना पाहण्याची संधी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेली प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांनी जिंकणे आवश्यक आहे.
  • अवकाश संशोधनाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सरकारने केले आहे. १० मिनिटांत म्हणजेच ६०० सेकंदांत २० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देणारे विद्यार्थी विजेते ठरतील.
  • या विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबरला इस्रोच्या केंद्रात हजर राहून चांद्रयान २’ चंद्रावर उतरतानाचा अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हजर असणार आहेत.
  • एका विद्यार्थ्यांला एक दाच स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा सुरु झाल्यानंतर मध्येच थांबवता येणार नाही. पालक विद्यार्थ्यांना प्रश्नाचा अनुवाद करुन सांगू शकतातमात्र उत्तरे लिहिण्यास मदत करु शकत नाहीत. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे नावपत्ता असलेले सरकारी ओळखपत्र आणि स्पर्धक हा शाळेचा विद्यार्थी असल्याचे संबंधित शाळेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहेअसे कळवण्यात आले.
  • विद्यार्थ्यांना २० ऑगस्ट पर्यंत स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून २ विजेते निवडले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://quiz.mygov.in/quiz/online-space-quiz/ या संकेतस्थळावर आपले खाते उघडावे.

नॉलेज क्लस्टरमध्ये पुण्यासह सहा शहरांची निवड :
  • केंद्र सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’  (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणेभुवनेश्वरचंडीगडजोधपूरअहमदाबादहैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये किंवा राज्यात अस्तित्वात असलेल्या संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात  समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे.
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांसाठी निश्चित केलेल्या अ‍ॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे.
  • या सर्व शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असूनकाही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेतअसे पीएसए कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारराष्ट्रीय स्तरावरील २० प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असूनतीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला.
  
काश्मीरविषयक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी :
  • घटनेतील अनुच्छेद ३७०च्या तरतुदी मागे घेण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध आणि इतर ‘प्रतिगामी उपाययोजना’ लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांची ही याचिका न्या. अरुण मिश्रान्या. एम.आर. शहा व न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीच्या यादीत आहे.
  • याशिवायअनुच्छेद ३७०च्या तरतुदी रद्द करण्यात आल्यानंतर राज्यातील श्रमिक पत्रकारांवर लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यात यावेअशी मागणी करणाऱ्या ‘काश्मीर टाइम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांनी केलेल्या याचिकेचाही सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी उल्लेख होण्याची शक्यता आहे.
  • आपण अनुच्छेद ३७० बाबत काहीही मत व्यक्त करत नसूनकाश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंधतसेच दूरध्वनी वाहिन्याइंटरनेट आणि वृत्तवाहिन्या बंद करण्यासारख्या उपाययोजना मागे घ्याव्यातअशी मागणी करत आहोतअसे पूनावाला यांनी म्हटले आहे.

रिलायन्स आणणार देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक :
  • देशाला आतापर्यंत सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळाल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज ४२व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केली. सौदी अरामको 'आरआयएल'च्या ओटूसी अर्थात ऑइल टू केमिकल उद्योगातील २० टक्के भागभांडवल खरेदी करणार असूनत्याचे एकूण मूल्य ७५ अब्ज डॉलर (अंदाजे ५३२४६६ कोटी) इतके आहे.
  • सौदी अरामकोशी केलेला करार ही देशातील आतापर्यंतची सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आहेअसं अंबानी यांनी सांगितले. आरआयएल आणि अरामकोमधील करारानुसाररिलायन्सच्या ओटूसी उद्योगातील २० टक्के भागभांडवल अरामको खरेदी करणार आहे. २०१९ या आर्थिक वर्षात रिलायन्सला या उद्योगातून ५.७ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेअसेही अंबानींनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरती आहेअसंही त्यांनी स्पष्ट केलं.
  • या करारानंतर अरामको जगातील सर्वात मोठ्या रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीला दररोज पाच लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. सौदी अरामको ही सौदी अरबमधील नॅशनल पेट्रोलियम अँड गॅस कंपनी असूनउत्पन्नाच्या बाबतीत ती जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीची क्षमता प्रतिदिन १.४ दशलक्ष बॅरल इतकी आहे. ती २०३० पर्यंत वाढवून २ दशलक्ष बॅरल करण्याचे नियोजित आहे. आरआयएलनं यासंदर्भात भारत सरकारशी चर्चा केली आहे.

No comments