Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 12 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मतेयुनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे?
A) प्रथम
B) द्वितीय
C) तृतीय
D) चतुर्थ

2) कोण 2018-19 या सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्डया पुरस्काराचा विजेता आहे?
A) मारिओ मॅन्डझुकिक
B) लिओनेल मेस्सी
C) क्रिस्टियानो रोनाल्डो
D) यापैकी कुणीही नाही

3) कोणती व्यक्ती लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019 अंतर्गत स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष असणार?
A) भारताचे राष्ट्रपती
B) पंतप्रधान
C) अर्थमंत्री
D) भारताचे प्रधान न्यायाधीश

4) कोणत्या फिन-टेक स्टार्टअप कंपनीने 'फ्रीडम कार्डसादर केले आहे जे सूक्ष्मलघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी भारतातले पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे?
A) लेन्डिंगकार्ट
B) मशरेक ग्लोबल
C) एनकॅश
D) क्याश

5) कोणत्या खासगी बँकेने हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले?
A) बंधन बँक
B) इंडसइंड बँक
C) फेडरल बँक
D) RBL बँक

उत्तरे 
1. (D) चतुर्थ
भारताची कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) आणि अमेरीकेच्या CBRE या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालाच्या मतेस्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात तिसर्‍या क्रमांकाचे गंतव्यस्थान आहे तसेच युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे.

2. (B) लिओनेल मेस्सी
बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्डया पुरस्काराचा विजेता ठरला.

3. (D) भारताचे प्रधान न्यायाधीश
लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019’ याला भारताच्या राष्ट्रपतींनी आपली मंजुरी दिली. नवा कायदा 1996 सालाच्या कायद्यात बदल करणार. भारताचे प्रधान न्यायाधीश (CJI) हे कायद्याच्या तरतुदींनुसार स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत.

4. (C) एनकॅश
एनकॅश या फिन-टेक स्टार्टअप कंपनीने 'फ्रीडम कार्डसादर केले आहे जे सूक्ष्मलघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी भारतातले पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड उद्योगांच्या त्वरित गरजांसाठी कर्ज सुविधा मिळविण्याची आणि त्यांची आर्थिक तरलता व्यवस्थापित करण्याची संधी देते.

5. (D) RBL बँक
RBL बँक आणि प्रॅक्टो कंपनी यांनी संयुक्तपणे मास्टरकार्डद्वारे समर्थित असलेले हेल्थकॅश या संकल्पनेसह एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले आहे. RBL बँक ही खासगी क्षेत्रात भारतातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारी बँक असून प्रॅक्टो हे भारतातले आघाडीचे एक डिजिटल आरोग्य-सुविधा मंच आहे. RBL बँक प्रॅक्टो प्लस क्रेडिट कार्डचे फायदे म्हणजे - 1 वर्षासाठी संपूर्ण काळ डॉक्टरांशी ऑनलाइन सल्लामसलत करण्याची सोयएकदा विनामूल्य पूर्ण शरीराची आरोग्य तपासणी. तसेच या कार्डावर खर्च होणार्‍या प्रत्येक 100 रुपयांमागे 1 प्रॅक्टो हेल्थकॅश मिळवता येणारजे पुढे (1 प्रॅक्टो हेल्थकॅश = 1 रुपया) याप्रमाणे खर्च करता येणार.

No comments