Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 12 August 2019

लिओनेल मेस्सी: 2018-19 सालासाठी UEFAच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड'चा विजेता बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या…

लिओनेल मेस्सी: 2018-19 सालासाठी UEFAच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड'चा विजेता
  • बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्डया पुरस्काराचा विजेता ठरला.
  • 2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते. गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.

युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात भारत चौथा देश: CREDAI व CBRE
  • भारताची कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) आणि अमेरीकेच्या CBRE या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालाच्या मतेस्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात तिसर्‍या क्रमांकाचे गंतव्यस्थान आहे तसेच युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
  • युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत सध्या अमेरीका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि चीनचा क्रम लागतो.
  • 2018 साली भारतात आठ युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार झाले आहेतज्यात झोमाटोओयोबायजूजपेटीएम मॉलउडान आणि स्विगी या कंपन्यांचा समावेश आहे.

सचिन-सेहवागला मागे टाकत विराट-रोहित जोडी ठरली अव्वल :
  • दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित-विराटने 74 धावांची भागीदारी करत सचिन-सेहवान जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.
  • विराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही 32 वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवान जोडीच्या नावावर 31 अर्धशतकी भागीदारी जमा आहेत.
  • भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.

CBSE: SC-ST विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात २४ टक्के वाढ :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्रही वाढ करताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत SC-ST प्रवर्गाती विद्यार्थ्यांच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. त्यानुसारआता SC-STच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ५० रुपयांवर १२०० रुपये करण्यात आले आहे तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ७५० वरुन १५०० रुपये इतके करण्यात आले आहे.
  • सीबीएससी बोर्डाने गेल्या आठवड्यातच या फी वाढीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार दहावी-बारावीची परीक्षा नोंदणी सुरु केली आहे त्यांना विद्यार्थ्यांकडून नव्या नियमानुसार शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयसीसीच्या नियमाला बीसीसीआयचा आक्षेप :
  • देशांतर्गत स्पर्धासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत परवानगी घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जोरदार आक्षेप घेतला आहे.
  • इंडियन प्रीमियर लीग किंवा रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत स्पर्धासाठी आयसीसीकडून परवानग्या मागण्याची बीसीसीआयची इच्छा नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या पालक मंडळाने आयोजित केलेल्या ट्वेन्टी-20 लीगसह फक्त एकाच आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळावेअसा आयसीसीचा नवा नियम प्रस्तावित आहे.
  • तर आयसीसीने हा नवा नियम बनवला असून आयपीएलबिग बॅश तसेच रणजी करंडकासह शेकडो देशांतर्गत स्पर्धासाठी संलग्न असलेल्या जगातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आयसीसीची परवानगी घेण्याचे सुचवले आहे. तसेच देशांतर्गत स्पर्धाचे आयोजन करताना आयसीसीची भूमिका ही फारच छोटी असते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेपहरकती आणि निरीक्षणे आयसीसीला कळवली आहेत.

No comments