Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 11 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) कोणता दिवस जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश यांचा स्थापना दिन असणार?
A) 1 सप्टेंबर 2019
B) 30 सप्टेंबर 2019
C) 1 ऑक्टोबर 2019
D) 31 ऑक्टोबर 2019

2) 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
A) अंधाधुन
B) उरी: द सर्जिकल स्ट्राईक
C) पद्मावत
D) बधाई हो

3) कोणत्या ब्रिटिश विनोदी अभिनेत्याला लॉस एंजेलिसमधील ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?
A) जॉर्ज कार्लिन
B) स्टीव्ह कूगन
C) रसेल हॉवर्ड
D) जोसेफ हॉवर्ड

4) जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?
A) समग्र जल सुरक्षा
B) समग्र जल शिक्षा सुरक्षा
C) समग्र जल-जीवन सुरक्षा
D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा

5) खालीलपैकी कोणत्या राज्याने 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम’ सादर केली?
A) पश्चिम बंगाल
B) तामिळनाडू
C) ओडिशा
D) महाराष्ट्र

6) भारतातली पाण्याखालून जाणारी पहिली रेलगाडी कुठे धावणार?
A) हुसेन सागर तलावहैदराबाद
B) हुगळी नदीकोलकाता
C) ब्रह्मपुत्र नदीगुवाहाटी
D) अपोलो वॉटरफ्रंट बंदर क्षेत्रमुंबई

7) कुठे इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) तर्फे तिसरी आंतरराष्ट्रीय विद्युत-क्षम वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली?
A) गुरुग्राम
B) नवी दिल्ली
C) मुंबई
D) गुवाहाटी

उत्तरे
1. (D) 31 ऑक्टोबर 2019
10 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जम्मू व काश्मीर पुनर्गठन कायदा-2019” याला त्यांची मंजुरी दिली. जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येण्यासाठी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हणजेच 31 ऑक्टोबर 2019 ही तारीख निश्चित केली आहे.

2. (A) अंधाधुन
भारताच्या ‘66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ यांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट - गुजराती चित्रपट हेलारो’; सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - अंधाधुन

3. (B) स्टीव्ह कूगन
स्टीव्ह कूगन या ब्रिटिश अभिनेत्याला लॉस एंजेलिस (अमेरीका) येथे 25 ऑक्टोबरला ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार 25 ऑक्टोबर 2019 रोजी दिला जाणार आहे.

4. (D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा
ऑगस्ट 2019 रोजी जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे समग्र शिक्षा-जल सुरक्षा’ या नावाने एक मोहीम सुरू करण्यात आली.

5. (C) ओडिशा
ऑगस्ट 2019 रोजी ओडीशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी 'स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीमसादर केली. नागरिकांमध्ये बचतीची सवय वाढविण्याच्या उद्देशाने ही योजना आहे. योजनेतल्या तरतुदींनुसार कोणताही पात्र व्यक्ती ओडिशामध्ये असलेल्या कोणत्याही टपाल कार्यालयात किंवा बँकेत 2019 या कॅलेंडर वर्षात ओडिशा राज्य सरकारच्या कोणत्याही लघू बचत योजनांमध्ये (किसान विकास पत्रसार्वजनिक भविष्य निर्वाह निधीराष्ट्रीय बचत प्रमाणपत्रटपाल कार्यालयाचे मासिक उत्पन्न खाते) यामध्ये किमान 2000 रुपये ठेव जमा करू शकतो. नंतर जिल्हाधिकारीउपजिल्हाधिकारी किंवा गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडून व्यक्तीला संकेतस्थळावर आधारित असलेले एक कूपन मिळू शकेल. ते कूपन लकी ड्रॉ तिकिटासारखे असणार.

6. (B) हुगळी नदीकोलकाता
भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. देशातली पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे.

7. (A) गुरुग्राम
मानेसरगुरुग्राम येथे तिसरी आंतरराष्ट्रीय विद्युत-क्षम वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली. ऑगस्ट 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कॉन्क्लेव्ह तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. परिषदेचे आयोजन इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) तर्फे केले गेले.

No comments